घरात किती रक्कम ठेवू शकता ?जाणून घ्या, नाहीतर भरावा लागणार 137 टक्के कर

112

घरात तुम्ही किती रोख रक्कम ठेऊ शकता, याविषयीचे कुतुहूल सर्वसामान्य लोकांना असतेच. घरात किती रोख रक्कम ठेवावी याविषयीची निश्चित अशी मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. तुम्हाला अमर्याद कॅश ठेवता येते. परंतु, एकच अट आहे, या रोख रक्कमेचे उत्पन्नाचे साधन तुम्हाला सादर करावे लागेल. म्हणजे ही रोख रक्कम तुम्ही कशी मिळवली, कशी कमाई केली त्याचा तपशील सादर करावा लागेल.

जर हे रोखीतील उत्पन्न कर पात्रतेच्या परीघात येत असेल तर त्यावर तुम्हाला करही मोजावा लागेल. त्यामुळे उत्पन्नाचे साधन असेल आणि त्याचा तपशील असेल तर कितीही रक्कम तुम्हाला घरात ठेवता येते. त्यासंबंधीची मर्यादा ठरवून देण्यात आलेली नाही.

तसेच, तुम्ही उत्पन्नावर कर भरत असाल तर तुम्हाला कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास हरकत नाही. त्याविषयीची योग्य कागदपत्रे, आयटीआर तुमच्याकडे असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला कमाईची मर्यादा नाही. तशी रोख रक्कम बाळगण्याची भीती नाही.

( हेही वाचा: मविआच्या काळात कौशल्य विकास केंद्राची जमीन ‘उर्दू लर्निंग सेंटर’ला आंदण )

…तर तुम्हाला कर भरावा लागले

जर आयकर विभाग तुमच्या उत्तरावर समाधानी नसेल तर तुम्हाला आणि उत्पन्न कुठून मिळवले याचे उत्तर द्यावे लागेल. त्यासाठीची कागदपत्रे सादर करावी लागतील. पण दस्ताऐवजात गडबड दिसून आली तर मात्र तुम्हाला दंडाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. कागदपत्रांत सुसूत्रता नसेल आणि अधिका-यांचे समाधान झाले नाही. गडबड आढळली तर नियमांचे उल्लघंन केले म्हणून तुम्हाला एकूण उत्पन्नावर 137 टक्के कर मोजावा लागेल. ही रक्कम फार मोठी असली तरी ती जमा करावी लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.