रोड ट्रीपला जायचंय… टोलचा खर्च किती होईल? गुगल मॅप देईल उत्तर

या नव्या अपडेटचा रोड ट्रीप करणा-यांना चांगलाच फायदा होणार आहे.

71

प्रवासादरम्यान वाटसरुला वाट दाखवणारे गुगल मॅप अनेकांच्या फायद्याचे आहे. रस्त्यावरचे खड्डे सोडले तर प्रत्येक गोष्टीची इत्तंभूत माहिती आपल्याला गुगल मॅपद्वारे दिली जाते. त्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरलेले हे अॅप आता एक नवे अपडेट घेऊन आले आहे. टोल नाक्यावर तुम्हाला किती रुपये टोल भरावा लागेल, याची संपूर्ण माहिती आता गुगल मॅपवर मिळणार आहे. त्यामुळे या नव्या अपडेटचा रोड ट्रीप करणा-यांना चांगलाच फायदा होणार आहे.

काय आहे नवे फीचर?

प्रवासादरम्यान किती टोल नाके असतील आणि प्रत्येक टोल नाक्यावर किती रक्कम भरावी लागेल, याची माहिती गुगल मॅपच्या या नव्या फीचरद्वारे तुम्हाला मिळणार आहे. या अपडेटवर सध्या गुगलकडून काम करण्यात येत आहे. पण हे फीचर युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल, याची कोणतीही माहिती अद्याप गुगलकडून देण्यात आलेली नाही.

(हेही वाचाः कन्फर्म तिकीट गावना नाय? तर ही बातमी वाचा…)

असे काम करेल फीचर

गुगल मॅप प्रीव्ह्यू प्रोग्रामनुसार भरावा लागणारा एकूण टोल युजर्सना त्यांच्या अॅपवर डिस्प्ले होणार आहे. या प्रीव्ह्यू प्रोग्रामच्या सदस्यांना नव्या फीचरबाबत संदेश पाठवण्यात आला होता. ज्यात रस्ते, पूल यांचा समावेश आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशनद्वारे टोलची रक्कम प्रदर्शित केली जाईल. रोड ट्रीपला जाणा-यांसाठी हे फीचर अतिशय उपयुक्त असणार आहे.

गर्दी कमी करण्यास होणार मदत

टोल नाक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी या फीचरचा चांगला वापर होणार आहे. टोल नाक्यांवर भरावा लागणारा टोल आधीच समजल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, अशी माहिती काही तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

(हेही वाचाः जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांमध्ये भारतातील ‘या’ शहरांचा समावेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.