UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही प्रणाली. या पद्धतीत एकापेक्षा अधिक बॅंक खात्यांना एकाच मोबाईल अॅपमध्ये जोडले जाते आणि थेट हव्या त्या व्यक्तीला आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार पैसे दिले जाऊ शकतात. पैसे देण्यासाठी ऑनलाईन वापरायची ही पद्धत आहे. सुरुवातीला अनेकांना या पद्धतीच्या वापराबाबत शंका होत्या परंतु आता मात्र भाजीबाजार आणि पानपट्टीच्या ठेल्यापासून मोठ्या माॅल्सपर्यंत अनेक ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करण्याच्या सुविधा पाहायला मिळतात.
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी UPI अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्यावे लागते. फोनपे, पेटीएम, भीम, मोबीक्वीक, गुगलपे, उबर, एसबीआयपे, बाॅबपे यासारखी अनेक अॅप्स आज आपल्याला उपलब्ध आहेत.
( हेही वाचा: तुमच्यामुळे कोणाला राग आला तर ‘या’ देशात होऊ शकतो तुरुंगवास )
अशी घ्या काळजी
- UPI पेमेंटसाठी वापरले जाणा-या अॅपमध्ये भीम अॅप हे भारत सरकारचे अॅप आहे. त्यामुळे त्यामागे शासकीय विश्वासार्हता आहे. आपले जे खाते आपण या अॅपशी संलग्न करणार आहोत. त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त पैसे ठेवण्याचे टाळा.
- आपल्या मोबाईलच्या काॅन्टॅक्ट लिस्टमध्ये ज्यांची नावे आपण स्टोअर केलेली असतील आणि त्यांच्यातल्या ज्यांनी त्यांचे ते मोबाईल नंबर्स त्यांच्या बॅंकेच्या खात्याशी जोडलेले असतील त्यांना आपण टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या साहाय्याने पैसे पाठवू शकता.
- सुरुवातीला आपल्याला लाॅग इन व्हावे लागते आणि ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या खात्याशी जोडले गेलात की पैसे पाठवण्याची सूचना देऊन आपल्याला आपला कोड किंवा ऑथेंटिकेशन नंबर टाइप करावा लागतो. हे करण्यापूर्वी आपण निवडलेली व्यक्ती नेमकी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत तीच आहे की ज्या खात्यावर आपण पैसे पाठवणार आहोत तेच नेमके तिचे खाते असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community