पॅनकार्ड हरवले किंवा खराब झाल्यास काय कराल? घरबसल्या Duplicate कार्डसाठी करा Apply

147

पॅनकार्ड हे भारतीयांचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आयकर भरताना, बॅंकेच्या कामाकाजासाठी, कर्ज घेताना पॅनकार्ड असेल तरच पुढील प्रक्रिया पूर्ण होते. तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत. अशावेळी तुमचे पॅनकार्ड हरवले किंवा खराब झाले तर आयकर विभागाकडून डुप्लिकेट पॅनकार्ड आपण घेऊ शकतो. तसेच या Duplicate pancard चे महत्त्व मूळ कार्डाएवढेच असते हे कार्ड सुद्धा वैध असते.

( हेही वाचा : Train Boarding Station Rule : आता कोणत्याही स्थानकावरून तुम्हाला पकडता येईल ट्रेन)

Duplicate पॅनकार्ड केव्हा मागवता येईल?

तुमचे मूळ (Original) पॅनकार्ड हरवले, खराब झाले अथवा चोरी झाले तर तुम्ही डुप्लिकेट पॅनकार्डसाठी विनंती करू शकता. पत्ता, स्वाक्षरी आणि इतर कोणत्याही तपशीलांमध्ये बदल करायचा असल्यास तुम्ही डुप्लिकेट पॅनकार्डसाठी विनंती करू शकता.

डुप्लिकेट पॅनकार्डासाठी अर्ज करण्यासाठी खालील Steps फॉलो करा

  1. डुप्लिकेट पॅनकार्डसाठी तुम्हाला https://www.tin-nsdl.com/ या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  2. यानंतर Apply Pan For Online या पर्यायवर क्लिक करा.
  3. reprint of pan card करण्यासाठी तपशील विभागाखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  4. क्लिक केल्यावर request for reprint of pan card ऑनलाइन अर्जाचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. येथे सर्व आवश्यक तपशील भरा.
  5. तुमचा पॅन क्रमांक, आधाक क्रमांक, तुमच्या पॅनकार्डशी लिंक केलेला क्रमांक आणि जन्म तारीख वर्ष ही माहिती भरा.
  6. Information declaration या पर्यायावर क्लिक करा. कॅप्चा कोड टाका आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
  7. यानंतर सर्व माहितीची खात्री केल्यानंतर तुम्हाला OTP येईल.
  8. OTP टाकल्यावर, व्हेरिफाय करा. पेमेंट ऑप्शन निवडा. जर तुमचे पॅनकार्ड भारतात पाठवायचे असेल तर याची किंमत ५० रुपये असेल आणि तुम्हाला भारताबाहेर पॅन पाठवायचे असेल तर तुम्हाला ९५९ रुपये भरावे लागतील.
  9. तुमच्याकडे डुप्लिकेट पॅनकार्डऐवजी ई-पॅन कार्ड ऑर्डर करण्याचा देखील पर्याय आहे. आवश्यक payment प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला रिसिप्ट नंबर दिला जाईल. हे ई-पॅनकार्ड किंवा डुप्लिकेट पॅनकार्ड सुद्धा तेवढेच वैध असते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.