सध्या ऑनलाईन पेमेंट सुविधांमुळे खिशात पैसे नसताना सुद्धा आपल्याला आर्थिक व्यवहार करता येतात. त्यासाठी आपण गुगल पे आणि फोन पे सारख्या अॅप्सचा वापर करुन पेमेंट करत असतो. त्यामुळे एकप्रकारे ही अॅप्स म्हणजे आपल्या मोबाईलमधील असेलेले पैशांचे पाकीटच आहे. पण जेव्हा आपला फोन चोरीला जातो तेव्हा त्याचबरोबर हे पाकीटसुद्धा चोरीला जाते आणि आपल्याला बँक अकाऊंटमधील पैशांची चिंता भासते. पण जसं आपण आपलं एटीएम ब्लॉक करतो तसंच आपल्याला ही अॅप्स ब्लॉक करुन आपले पैसे सुरक्षित ठेवता येतात.
असे ब्लॉक करा Phone Pe अकाऊंट
- Phone Pe यूजर्स कुठल्याही फोनवरुन 08068727374 किंवा 2268727374 या नंबरवर कॉल करा.
- त्यानंतर आपली समस्या नंबर दाबून सांगा.
- व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी देण्यात येईल.
- मोबाईल हरवल्यामुळे तुम्हाला ओटीपी मिळाला नाही तर I have not received an OTP सिलेक्ट करा.
- त्यानंतर कस्टमर सपोर्ट टीम योग्य ती माहिती व्हेरिफाय करुन तुमचे Phone Pe अकाऊंट ब्लॉक करायला मदत करेल.
(हेही वाचाः RTO चा नवा नियमः लायसन्समधील ही गोष्ट तपासून घ्या, नाहीतर 5 हजार दंड भरा)
Google Pay अकाऊंट असे करा ब्लॉक
- Google Pay अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी कुठल्याही नंबरवरुन 18004190157 या नंबरवर फोन करा.
- यानंतर कस्टमर सपोर्ट गुगल पे अकाऊंटला ब्लॉक करायला सूचना करेल.
- त्याचबरोबर iOS आणि Android युजर्स रिमोटली डेटा डिलिट करुन तुमचे गुगल पे आणि फोन पे अकाऊंट ब्लॉक करू शकता.