सुट्टीच्या दिवशी भर दुपारी आपण मस्त ताणून दिलेली असताना आपला मोबाईल वाजतो आणि आपली झोपमोड होते. मोबाईल स्क्रीनवर लाल रंगात एक नंबर झळकत असतो आणि कंपनीचा कॉल म्हणत आपण तो लगेच कट करतो. पण आपली झोपमोड झाल्याचा इतका वैताग येतो की, त्या क्षणाला फोन फेकून द्यावा असं आपल्याला वाटतं. पण असं काही करायची गरजच नाही. कारण अवघ्या काही स्टेप्स वापरुन आपण हे कॉल्स बंद करू शकतो.
कामाच्या वेळेत किंवा निवांत क्षणी असल्या टेलीमार्केटिंग किंवा स्पॅम कॉल्समुळे आपल्या मूडची वाट लागते. इतकंच नाही तर कधीकधी या कॉल्समुळे मोठी फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे या टिप्स वापरुन असले कॉल्स आपल्याला आपल्या ब्लॉक करता येतात.
(हेही वाचाः तो फक्त 35 रुपयांसाठी नडला आणि रेल्वेला अडीच कोटींना भारी पडला)
असे करा कॉल ब्लॉक
Jio युजर्स
Jio, Airtel,Vodfone-Idea(Vi) मोबाईल धारक अॅप्सच्या माध्यमातून हे कॉल्स किंवा मेसेज बंद करू शकतात. जर तुम्ही Jio ग्राहक असाल तर MyJio अॅपमध्ये जाऊन सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला Do Not Disturb(DND) हा ऑप्शन दिसेल. त्यावर आपल्या प्रेफरन्सनुसार तुम्ही आपल्याला नको असलेले कॉल्स कायमस्वरुपी ब्लॉक करू शकता.
VI, Airtel युजर्स
Vi युजर्स आपल्या Vi अॅपमधील My Account या ऑप्शनवर क्लिक करुन DND सुविधा चालू(DND Activation)करू शकतात. Airtel ग्राहक सुद्धा याच पद्धतीने अॅपच्या माध्यमातून असे नको असलेले कॉल्स बंद करू शकतात.
(हेही वाचाः रिचार्ज महागणार! Jio, Airtel आणि VI चे हे आहेत नवे दर)
तसेच तुमचं सिम कार्ड ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ही सर्व्हिस चालू करता येऊ शकते. यामुळे नको त्या वेळी नको त्या लोकांचे फोन तुम्ही कायमस्वरुपी बंद करू शकता.
Join Our WhatsApp Community