तुमच्या 4G फोनवर 5G सपोर्ट करतं की नाही? असे करा चेक

135

5G स्पेक्ट्रमच्या भव्य दिव्य लिलिवानंतर आता लवकरच देशात 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 5G फोन्सचा बोलबाला आहे. पण ज्यांच्याकडे 4G फोन्स आहेत त्यांच्या मोबाईलवर 5G सुविधा लागू होते की नाही, याबाबत अनंकांमध्ये संभ्रम आहे.आपल्या फोनमधील सेटिंगच्या आधारे आपण हे तपासू शकता.

सेटिंगमध्ये करता येईल चेक

देशात सध्या 4G फोन वापरणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आपला फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलची सेटिंग चेक करावी लागेल. सेटिंग ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर अनेक पर्याय येतील. त्यात Connection or Wifi Network या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिम आणि नेटवर्क किंवा मोबाईल नेटवर्क पर्यायावर क्लिक करा.

(हेही वाचाः आधार कार्डवर मिळणार 5 लाखांचं कर्ज, सरकारने स्पष्ट सांगितलं)

असेही करता येईल चेक

त्यानंतर आपल्यासमोर Network Mode चा पर्याय येईल. या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला 5G Preffered Network Type हा ऑप्शन दिसत असेल तर तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच स्मार्टफोन ब्रँडच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्हाला फोनचे मॉडेल शोधावे लागेल. जर फोन Features मध्ये 5G बँडबद्दल माहिती दिली असेल तर तुम्हाला तुमच्या फोनवर 5G सेवा उपलब्ध होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.