Anger : रागावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा उपाय जाणून घ्या…

219

आज आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर ते लोक तांडव करतात. कोणतीही भावना जास्त व्यक्त करणे देखील हानिकारक आहे. क्रोध हा माणसाचा शत्रू आहे. अनेकदा लोक खूप रागात असताना काहीतरी बोलतात किंवा करतात, ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. रागामुळे अनेकदा नातेही बिघडते.

मुलांवर पालकांचा अति राग, जोडप्यांचा एकमेकांवर किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांवरचा अतिरेक जीवघेणा ठरू शकतो. रागाने माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते. संतप्त लोक अशी अनेक पावले उचलतात जे चुकीचे ठरू शकतात.

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्हाला जास्त राग येत असेल तर तुम्ही रागाच्या भरात अशा काही गोष्टी बोलू शकता ज्यामुळे तुमचे नाते तुटू शकते. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे जाणून घेतले पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवण्याचे किंवा राग कमी करण्याचे उपाय जाणून घेऊया.

(हेही वाचा Direct Tax Collection : १० ऑगस्टपर्यंत सरकारी तिजोरीत साडेसहा लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा)

रागाच्या भरात चुकीचे बोलण्यापेक्षा खूप राग येतो तेव्हा गप्प राहणे चांगले. तुम्ही काहीही बोलणार नाही तेव्हा वादाची परिस्थिती अजिबात निर्माण होणार नाही. दुसरीकडे, तुम्ही रागात असताना गप्प राहिल्यास, रागात चुकीचे शब्द वापरणे टाळाल. तिथेच हे प्रकरण मिटणार आहे. बोलायचेच असेल तर विचारपूर्वक बोला.

रागाचा प्रभाव कशावर पडतो

जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरीत विष टाकत असता ही गोष्ट लक्षात घ्या. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, व्यावसायिक जीवन यावर प्रभाव पडतो.

रागावर नियंत्रण कसे मिळवायचे?

योगा करणे, थोडा वेळ चालाणे, ध्यान करणे, दीर्घ श्वास घेणे, चांगली झोप घ्या, गरजेचे आहेत. हे रागावर नियंत्रण अनन्यास मदत करते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.