माघी गणेश जयंतीला अशी करा बाप्पाची उपासना!

134

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.

( हेही वाचा : ७ वर्षीय मुलीने पाच तासांत बनविले ५१ गणपती बाप्पा! इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद )

महत्त्व : या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो.

गणेशजयंतीला गणेशतत्वाचा लाभ होण्यासाठी करावयाची उपासना : या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ति आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यासही लाभ होतो.

गणपतीचे वाहन : वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत. उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे.

श्री गणेशाची उपासना म्हणून प्रतिदिन खालील गोष्टी कराव्यात :

1. अथर्वशीर्षाचे पठण : आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्वशीर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशीर्षाचे पठण करावे.

2. अधिकाधिक प्रार्थना : आपण ज्या भाषेत बोलतो, तिला नादभाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा श्रीगणपतीला आपली भाषा अधिक कळते; म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करावी.

3. मानसपूजा : मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. याला कोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.