‘या’ पद्धतीने काही मिनिटांत करा तुमचा फोन फॉर्मेट…

368

स्मार्टफोन ही अलिकडे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये महत्वाचे फोटो, व्हिडिओ, फाईल्स यासह अनेक गोष्टी संग्रहित केलेल्या असतात. नवा स्मार्टफोन खरेदी करताना, जुन्या फोनमधील सर्व डेटा कॉपी करावा लागतो. नवा फोन खरेदी करताना आपण अनेकदा जुना फोन एक्सचेंज करतो. अशा स्थितीमध्ये जुन्या फोनमधील संपूर्ण डेटाचा बॅकअप घेणे. तसेच, हँडसेटला फॉर्मेट करणे गरजेचे आहे. स्मार्टफोन फॉर्मेट न केल्यास तुमच्या डेटाचा चुकीच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो. फोनला फॉर्मेट कसे कराल, याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

( हेही वाचा : एसटीअभावी प्रवाशांचे आतोनात हाल, अद्यापही संप सुरुच )

  • फोन इतरांना वापरण्यास देण्याआधी फॉर्मेट (Smartphone format) करणे गरजेचे आहे. फॉर्मेट केल्यानंतर सुद्धा स्मार्टफोनमधील सर्व सेटिंग्स तशाच राहतील.
  • फॉर्मेट केल्यानंतर डिव्हाइसला वापरण्यासाठी तुम्हाला पुन्हा सर्व अ‍ॅप्सला डाउनलोड करावे लागेल. तसेच, क्रोम लॉगइन करावे लागेल. मात्र, फोन फॉर्मेट करण्याआधी डेटा बॅकअप नक्की घ्या.
  • फॉर्मेट करण्याआधी तुम्हाला तुमचा सर्व डेटा गुगल ड्राईव्ह, पेन ड्राईनव्ह किंवा हार्ड ड्राईव्हवर स्टोर करता येईल. यानंतर तुम्ही हा डेटा इतर फोनमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता.

फॉर्मेट करण्याची सोपी पद्धत (factory reset on android phone)

  • सर्वप्रथम स्मार्टफोन सेटिंग्समध्ये जा.
  • सेटिंग्समध्ये सिस्टम पर्यायावर क्लिक करा.
  • यामध्ये तुम्हाला मोबाईल रिसेटचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • याठिकाणी फॅक्ट्री रिसेट या पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • डिलीट होणाऱ्या डेटाविषयी माहिती जाणून घ्या.
  • यानंतर स्क्रिनवर तुम्हाला वॉर्निंग येईल त्यानंतर इरेज ऑल डेटा करून तुमचा फोन फॉर्मेट होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.