Fats : पोटावरील थुलथुलीत लटकलेल्या चरबीला कसे कराल छूमंतर?

198

पोटाच्या आत आणि बाहेरही चरबी जमा होणं हे अत्यंत धोकादायक आहे. पोटाच्या साठलेल्या चरबीमुळे हृदय रोग, टाइप २ मधुमेह, लिव्हर रोग आणि कॅन्सरसारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. पोटामध्ये सर्वात आधी चरबी जमा होऊ लागते आणि सर्वात शेवटी ही चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी करताना सर्वात आधी पोटाची आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी स्पेशल डाएट आणि व्यायामाची आवश्यकता असते.

जन कमी करण्यासाठी काही फळांचा डाएटमध्ये समावेश करून घ्यायला हवा. Select Health ने केलेल्या अभ्यासानुसार, काही फळं ही पोटातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात हे सिद्ध करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत.

सफरचंदाची कमाल

सफरचंद हे नियमित खायला हवे हे लहानपणापासूनच आपण ऐकत आलो आहोत. सफरचंदामध्ये फायबर आणि पॅक्टिन असून आरोग्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. याशिवाय पोटामध्ये चरबी अतिरिक्त जमा होण्यासाठी सफरचंद रोख लावते. याशिवाय सफरचंदामध्ये लठ्ठपणा कमी करण्याची ताकद असून कॅलरी आणि साखर कमी प्रमाणात असते. यामुळे वजन कमी करताना सफरचंदाचा उपयोग करून घ्यावा.

पीच फळाचा करा उपयोग

पीच हे फळ अत्यंत उपयोगी ठरते. १०० ग्रॅम पीचमध्ये साधारणतः १.६ ग्रॅम इतके फायबर असते. फायबरमुळे मलत्याग सुलभ होतो आणि पचनक्रियादेखील अत्यंत चांगली होण्यास मदत मिळते. चयापचय सक्रिया करण्यासाठी पीच फळाचा नाश्त्यात समावेश करून घ्यावा. १०० ग्रॅम पीचमध्ये केवळ ३९ कॅलरी असून वजन घटविण्यासाठी आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा न करण्यासाठी याचा फायदा होतो.

(हेही वाचा Islam : ‘इस्लाम स्वीकारा नाहीतर..’ बेंगळुरूमध्ये सेक्सटॉर्शन रॅकेट चालवताना मॉडेल करायची धर्मांतर)

पेरू ठरतो फायदेशीर

पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अथवा GI वॅल्यू अत्यंत कमी असते. हे इन्सुलिन क्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करते आणि वजन नियंत्रित करण्यासाठीही पेरूचा फायदा होतो. पेरू हे हंगामी फळ आहे आणि याचे नियमित सेवन केल्यास, तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रणात नक्कीच आणू शकता.

अननसाचे फळ

अननसामध्येही फायबर अधिक प्रमाणात आढळते आणि वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. यामध्ये ब्रोमेलन नावाचे एंजाइम असून अँटीइन्फ्लेमेटरी गुणही आढळतात. तसंच एंजाईम प्रोटीनच्या मेटाबॉलिजमसाठी मदत करते आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी अननस खावे.

स्ट्रॉबेरीचा उपयोग

पोटाची चरबी कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी हे फळंही उपयुक्त ठरते. स्ट्रॉबेरीमध्ये असणारे फायबर हे केवळ पचनक्रियेसाठीच चांगले ठरत नाही तर टाइप २ मधुमेह नियंत्रित करण्यासाठीही उपयुक्त ठरते. कारण यातील फायबर रक्तातील साखरेची पातळी कमी करून वजन नियंत्रणात राखण्यासही फायदेशीर ठरते.

किवी ठरते उत्तम

किवीच्या फळामध्ये अ‍ॅक्टिनिडीन नावाचे एंजाइम असून शरीरामध्ये प्रोटीनचे पचन करण्यासाठी मदत करते. किवीफ्रूट पचनासाठी उत्तम असून वजन कमी करण्यासाठी मदत करते. किवीचा वापर हा वजन नियंत्रित करण्यासाठी योग्य ठरतो. आपल्या नाश्त्यामध्ये तुम्ही या फळाचा समावेश नक्कीच करून घ्यायला हवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.