आता तुम्ही ठरवा WhatsApp चा DP कोणाला दाखवायचा अन् कोणाला नाही?

131

सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपमुळे कोणाशीही कधीही बोलता येणं शक्य होत असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर करोडो लोक करतात. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमी काहीतरी नवीन फीचर्स आणत असते. आत्ताही एक अशीच प्रायव्हसी सेटिंग व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणली आहे. या सेटिंगची वाट कदाचिक आपल्यापैकी अनेक युजर्स बघत असतील.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ होणार!)

व्हॉट्सअॅपने अलिकडेच व्हॉट्सअॅप ऑनलाइन पेमेंटचा पर्याय देखील आणला होता. यानंतर आता एक नवं फीचर आले आहे. ज्यामुळे तुम्हाला डीपी, लास्ट सीन कोणी पहावे आणि कोणी बघू नये हे ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. या नव्या सेटिंगमुळे आता आपला फोटो, अबाऊट आणि लास्ट सीन कोणाला दाखवावे कोणाला नाही, यावर व्हॉट्सअॅप युजर नियंत्रण ठेवू शकणार आहे. केवळ युजरने निवडलेल्या कॉन्टॅक्ट्सलाच फक्त या वरील गोष्टी दिसतील. हे सेटिंग अद्याप अधिकृतरित्या लाँच झालेलं नाही. मात्र, काही विशिष्ट युजर्सला ही सेटिंग करता येणार आहे. हे प्रायोगिक तत्वावर राबवलं जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

असा वापरा नवं फीचर

  • Tap On Account या पर्यायावर जावं लागणार आहे
  • त्यानंतर tap privacy यावर क्लिक करा
  • Tap On Profile Photo यावर आल्यानंतर तुमच्या समोर नवा पर्याय येईल
  • Tap On My Contacts Except हा तुमचा नवा पर्याय असणार आहे
  • आता तुम्ही अशा लोकांना निवडा ज्यांना तुम्ही तुमचा फोटो दाखवू इच्छित नाही.
  • त्यानंतर डन या बटणावर क्लिक करा. हे केल्यानंतर सिलेक्ट केलेल्या लोकांना तुमचा फोटो सिलेक्टेड लोकांना दिसणार नाही
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.