Mobile : मुलांना मोबाइलपासून कसे दूर ठेवणार?

259

आजकाल लहान मुले मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. एकप्रकारे त्यांना याचे व्यसनच जडले आहे. परंतु, लहान मुलांची हीच सवय त्यांच्यावर जीवावर बेतणारी आहे. कारण मोबाईल Mobile, टीव्ही, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर आणि संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. तंत्रज्ञानामुळे होणारे हे नुकसान माहित असूनही बहुतांश पालक आपल्या मुलांना या व्यसनातून बाहेर मात्र काढू शकत नाहीत. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण आपल्या मुलांना सहज मोबाईलपासून दूर ठेवू शकता.

मैदानावर खेळायला सोडा 

हल्लीच्या लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने मुले घरीच खेळतात. यामधील बहुतांश वेळ ते गॅझेट्ससोबतच घालवतात. पण मुलांना मोकळ्या हवेत आणि ऐसपैस खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली पाहिजे. त्यासाठी मुलांना वरचेवर बागेत खेळायला घेऊन जा. त्यांना मोबाईलपेक्षा प्रत्यक्षातील खेळाची मजा अनुभवू द्या. मुले पालकांचेच अनुकरण करत असतात. पालकांना बघूनच ते विविध गोष्टी शिकत असतात. जर आई-वडीलच सतत मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलांना देखील हीच सवय लागणार. हे टाळण्यासाठी पालकांनीच मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. तरच मुले याचे अनुकरण करणे टाळतील. याऐवजी पालकांनी दिवसातील काही वेळ हा पुस्तक वाचनात घालवायला हवा. मुले त्याचे अनुकरण करतील आणि मोबाईलपासून Mobile दूर राहतील.

(हेही वाचा गोव्यातही ISISचे प्रशिक्षण तळ; अटक केलेल्या दहशतवाद्यांचा काय होता कट?)

मोबाईलला पासवर्ड लावा 

तुम्ही नसताना मुले तुमचा मोबाईल Mobile घेत असतील तर त्यांच्या या कृतीला आळा घातला पाहिजे. यासाठी मोबाईलला पासवर्ड लावून ठेवा. त्यामुळे, तुम्ही आजूबाजूला नसलात तरी मुलं हातात मोबाईल घेणार नाहीत.

मोबाईलमुळे हे दुप्ष्परिणाम होऊ शकतात 

ब्रेन ट्युमर

आपल्या मेंदूवर मोबाईलमधून निघणाऱ्या electromagnetic रेडिएशनचा थेट परिणाम होत असतो. संशोधनानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता जास्त असते.

एकाग्रतेचा अभाव

मोबाईलच्या Mobile अतिवापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शरीरावर शारीरिक आणि मानसिक ताणामुळे वापरकर्त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.