एखाद्या फॉर्मवर फोटो चिकटवण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला आपल्या पासपोर्ट साईज फोटोची आठवण होते. मग आपण ते फोटो शोधण्यासाठी धावपळ करतो आणि मग ते सापडले नाहीत की नवीन फोटो काढण्यासाठी स्टुडिओत जातो. पण कधी-कधी स्टुडिओत जाऊन फोटो काढण्याइतका वेळही आपल्याकडे नसतो आणि मग आपली पंचाईत होते.
पण आता पासपोर्ट साईज फोटोचं टेन्शनच सोडून द्या, कारण स्टुडिओत न जाता तुमच्या मोबाईलवरुन घरबसल्या तुम्हाला तुमचा फोटो काढता येऊ शकतो.
फक्त या स्टेप्स फॉलो करा
- पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी https://www.123passportphoto.com/ या वेबसाईटला विझिट करा.
- तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोचे ऑप्शन्स देण्यात येतील, यापैकी Passport 3.5 x 4.5 cm (35 x 45 mm) हा ऑप्शन सिलेक्ट करुन स्टार्ट बटनवर क्लिक करा.
- नंतर आपल्या मोबाईलच्या गॅलरीतील एक फ्रंटल फोटो सिलेक्ट करा किंवा तुम्ही तुमचा चांगला सेल्फीसुद्धा काढून तो सिलेक्ट करू शकता.
- या फोटोची साईज 10 Mb पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- त्यानंतर येणा-या चौकटीत आपला चेहरा नीट adjust करुन Next बटणवर क्लिक करा.
- नंतर योग्य ते बॅकग्राउंड सिलेक्ट करा, यानंतर तुम्हाला फोटोचा Preview दिसेल आणि डाऊनलोड ऑप्शन दिसेल.
- फ्रीमध्ये हा फोटो डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक फेसबूकला शेअर करा आणि आपले पासपोर्ट साईज फोटो डाऊनलोड करा.
(हेही वाचा: Train Running Status: रेल्वेच्या ‘या’ वेबसाईटवर कळणार ट्रेनचे लाईव्ह स्टेटस)
Join Our WhatsApp Community