जाणून घ्या! कसा तयार होतो ऑक्सिजन? 

सध्या देशभरातील लाखो कोरोनाबाधित रुग्णांचे जीवन आणि मृत्यू यातील अंतर कायम ठेवणाऱ्या ऑक्सिजनचे किती महत्व आहे, हे आता सगळ्यांना पटू लागले आहे. अशा ऑक्सिजनची निर्मिती नक्की कशी होते, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. 

सध्या देशभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाचा डबल म्युटंट हा आधीपेक्षा अधिक जलद गतीने फुफ्फुसांवर आक्रमण करतो, परिणामी फुफ्फुस निकामी होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होताच पहिल्या पातळीवर श्वसन प्रक्रिया कमजोर होते. अशा वेळी त्या कोरोनाबाधित रुग्णासाठी ऑक्सिजन हा खरोखरीच ‘प्राणवायू’ ठरतो. आजमितीस देशात जेवढे ऑक्सिजनचे उत्पादन होते, त्यापेक्षा अधिक पटीने देशात कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात आठवड्यापासून मृत्यूचे तांडव सुरु आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी अवघ्या काही मिनिटांत २४ जणांचा मृत्यू झाला, तर दिल्लीत २२ जण दगावले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने साखर कारखान्यांनाही ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. हा ऑक्सिजन म्हणजे काय, तो असतो कसा, त्याचे उत्पादन कसे होते, याविषयी माहिती जाणून घेऊया.

(हेही वाचा : अजून एक अग्नितांडव! विरार येथील रुग्णालयाला आग… १३ जणांचा मृत्यू)

ऑक्सिजनचे म्हणजे काय, त्याचे महत्व काय

 • वैद्यकीय उपचारांमधील मेडिकल ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
 • मानवासह अन्य प्राणीजगताला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असते. अगदी फिशटँकमधील माशालाही ऑक्सिजन  द्यावा लागतो.
 • हा ऑक्सिजन हवा आणि पाण्यामध्ये उपस्थित असतो. हवेत २१ टक्के ऑक्सिजन तर ७८ टक्के नायट्रोजन असतो.
 • ऑक्सिजन प्लँटमध्ये हवेमधून केवळ ऑक्सिजन वेगळा केला जातो.

 • मेडिकल ऑक्सिजन हा ९८ टक्क्यांपर्यंत शुद्ध असतो. यामध्ये बाष्प, धूळ किंवा इतर वायू नसतात.
 • २०१५ मध्ये देशातील अत्यावश्यक औषधांच्या यादीत ऑक्सिजनचा समावेश केले होता.
 • डब्ल्यूएचओनेसुद्धा आवश्यक वैद्यकीय सामुग्रीत त्याचा समावेश केला आहे. वातावरणातील २१ टक्के ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय उपचारांमध्ये करता येत नाही.
 • म्हणून मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती द्रवरूपात शास्त्रीय पद्धतीने मोठमोठ्या प्लँटमधून केली जाते.

(हेही वाचा : ऑक्सिजनच्या गळतीने २२ रुग्ण दगावले… नाशिकच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार!)

अशी होते ऑक्सिजनची निर्मिती! 

 • मेडिकल लिक्विड ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी एअर सेप्रेशनच्या तंत्राचा वापर केला जातो. म्हणजेच हवेवर दाब देऊन नंतर ती फिल्टर करून त्यामधील अशुद्ध घटक वेगळे केले जातात.
 • ही फिल्टर केलेली हवा थंड केली जाते. तिला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते.
 • सर्वप्रथम वातावरणातील शुद्ध ऑक्सिजन केला जातो. ऑक्सिजनचा बॉयलिंग पॉईंट – १८३.०० डिग्री सेल्सियस एवढा आहे.

 • हवा खूप थंड करून त्यातून ऑक्सिजन वेगळा केला जातो. हा ऑक्सिजन द्रवरूपात गोळा केला जातो. यामधून ९९.५ टक्के शुद्ध लिक्विड ऑक्सिजन मिळतो.
 • त्यानंतर ऑक्सिजनला कॉम्प्रेस करून गॅसमध्ये परिवर्तित केले जाते. मग रिफिलिंग स्टेशनला पुरवून सिलिंडरमध्ये जमा केले जाते.
 • हा ऑक्सिजन गॅस मोठ्या आणि लहान कॅप्सुलसारख्या टँकरमध्ये भरून रुग्णालयांपर्यंत पोहोचवला जातो.
 • एका ऑक्सिजन सिलेंडरला भरण्यासाठी ३ मिनिटांचा अवधी लागतो. मात्र इथे एकावेळी पॅनेल बनवून २० पेक्षा अधिक सिलिंडर भरता येतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here