उन्हाळा सुरू झाला की शरीराला पोषक, गारवा देणारी कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. फ्रूट सॅलड, ज्यूस बनवण्यासाठी कलिंगडचा वापर होतो. उन्हाचा कडाका वाढल्याने कलिंगडची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गडद हिरव्या रंगाचे कलिंगड ‘शुगर किंग’ तर, हिरवे पट्टे असणारे कलिंगड ‘नामधारी’ या नावाने ओळखले जाते.
( हेही वाचा : रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर १२ तासांचा मेगाब्लॉक! )
कलिंगड खरेदी करताना ते आतून लाल, रसाळ, गोड असेल की नाही हे कसे ओळखाल यासाठी काही टिप्स…
- गडद हिरव्या रंगाचे साल असलेले कलिंगड गोड असते.
- एक लहानसा तुकडा कापून घेतला तर तुम्हाला संपूर्ण फळ कसे आहे याचा अंदाज येईल.
- कलिंगड आतून गोड आणि रसाळ असेल तर त्याचा गोडसर सुगंध येतो. कलिंगड खूप जुने किंवा कडू असेल तर त्याचा कडवट, आंबट वास येईल
- कलिंगडावर काळा डाग असल्यास असे कलिंगड खराब लागण्याची शक्यता असते.
बाजारात कलिंगडाची आवक वाढणार
बाजारात श्रीगोंदा, दौंड, सोलापूर, सातारा, कराड, शिरूर, कर्जत, राशन, कर्नाटक येथून कलिंगडाची आवक होत आहे. पुढील काही दिवसांत बाजारात कलिंगडाची आवक वाढणार आहे. तसेच, उन्हाळा वाढेल तसे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढणार आहे. संपूर्ण उन्हाळा कलिंगडाचा हंगाम चालणार असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community