Instagram Account हॅक झाले तर असे करा Recover

246

Instagram हा सध्या तरुणाईमध्ये फेमस असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून अनेक जण अलीकडे स्टार झाल्याचेही पहायला मिळाले आहे. पण फेसबूक प्रमाणेच इंन्स्टाग्राम अकाऊंटदेखील हॅक होण्याच्या असंख्य तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत आहेत.

(हेही वाचाः EPFO Interest Rate: PF च्या व्याजदरात 43 वर्षांतील सर्वात मोठी घसरण)

अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे अनेक गैरप्रकार देखील करण्यात येतात. आता समजा आपले अकाऊंट हॅक झाले तर काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपण टेन्शनमध्ये येतो. पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, ही माहिती शेवटपर्यंत वाचा आणि डोस्क्याचा ताण विसरा.

सर्वात आधी हे करा

  • अकाऊंट झाल्यानंतर तुम्ही इन्स्टाग्रामच्या सेटिंग्समधील Accoun Recovery ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा Email Id किंवा फोन नंबर एंटर करा.
  • नंतर Instagram कडून तुम्हाला एक लिंक मेल करण्यात येईल.
  • पण हॅकर्सकडून ही सुविधाही ब्लॉक करण्यात येऊ शकते.

(हेही वाचाः IRCTC Rules:ट्रेनच्या प्रवासाला आता विमानाचा नियम, इतक्याच वजनाचं लगेज फ्रीमध्ये नेता येणार)

असे झाल्यास काय कराल?

  • अशावेळी इन्स्टाग्रामच्या वेबसाईटवर जाऊन अकाऊंट डिटेलचा फॉर्म भरा.
  • त्यावर My account was hacked हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला साईटवरुन एक कोड सेंड केला जाईल.
  • त्यानंतर इन्स्टाग्रामकडून तुमचा सेल्फी फोटो क्लिक करण्यात येईल.
  • तुमचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करण्यात येईल. यानंतर तुमचा सेल्फी फोटो आणि तुमच्या इन्स्टाग्राम पोस्ट याद्वारे इन्स्टाग्रामकडून तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करण्यात येईल.
  • त्यानंतर तुम्हीच खरे युजर्स आहात याची खात्री कुन तुमचे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात येईल.
  • Instagram ची ही सिस्टीम हॅक४स हॅक करू शकत नाहीत, त्यामुळे याद्वारे तुम्हाला तुमचे अकाऊंट नक्कीच रिकव्हर करता येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.