पावसाळ्यात तुमच्या स्मार्टफोनची अशाप्रकारे घ्या काळजी…

सध्या संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे पावसात बाहेर पडताना आपल्या जवळील वस्तूंची, प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसची ( electronics device) पावसात विशेष काळजी घ्यावी लागते. पावसात पूर्णवेळ फोन बॅगमध्ये ठेवला तर कोणाचा फोन आलाय हे सुद्धा कळत नाही, थोडेही पाणी गेले तर तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला खालील उपाय करून सुरक्षित ठेवू शकता.

( हेही वाचा : आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी!)

Waterproof pouch चा वापर करा

स्मार्टफोनमध्ये थोडेही पाणी गेले तर तुमचा फोन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात बाहेर पडताना कायम waterproof puch चा वापर करा. सध्या बाजारात येणारे अनेक फोन्स वॉटरप्रूफ असतात असा दावा मोबाईल कंपन्या करतात तरीही तुम्हा आवर्जून पाउचचा वापर करा हे Pouch ५० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Bluetooth earphones वापरा

पाऊस सुरू असताना फोनवर बोलणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत तुम्ही फोन बॅगमध्ये ठेवता. अशावेळी एखादा महत्त्वाचा फोन आल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून पावसात शक्यतो तुम्ही वॉटरप्रूफ bluetooth आणि earbuds चा वापर करा याद्वारे तुम्ही पावसात सुद्धा कॉलवर बोलू शकता आणि मनोरंजनासाठी गाणीही ऐकू शकतात.

फोनला झाका

अनेकवेळा आपण घराबाहेर पडल्यावर अचानक पाऊस येतो. अशा परिस्थितीत तुम्ही फोनला पेपर किंवा पॉलिथिन बॅगने झाका. यानंतर तुम्ही फोनला मऊ कपड्याने पुसा.

रेनकोटचा वापर करा

पावसात भिजण्यापासून तुम्हाला रेनकोट सुरक्षित ठेऊ शकतो. पावसात रेनकोटचा वापर केल्यास तुमचा फोनही सुरक्षित राहू शकतो.

स्मार्टफोन पाण्यात भिजल्यास काय कराल

बाहेर गेल्यानंतर तुमचा स्मार्टफोन पावसात भिजल्यास त्वरित फोन स्विच ऑफ करा त्यातील सिम कार्ड, मेमरी कार्ड काढून ठेवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here