आधार कार्डवर घरबसल्या अपडेट करा तुमचा Address; फॉलो करा ही सोपी प्रक्रिया…

97

आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे शाळेत प्रवेश घेण्यापासून, बॅंकेचे कामकाज, सिम कार्ड खरेदी करताना, पासपोर्ट काढताना अशा सर्व महत्त्वाच्या कामकाजात आधार कार्ड अनिवार्य असते. आधारमध्ये तुमची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती असते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे गरजेचे असते. तुमच्या आधार कार्डवरील पत्ता चुकीचा असल्यास तुम्ही आता आधार वरील पत्ता घरबसल्या बदलू शकता. यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा…

( हेही वाचा : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करत तोडगा काढणे आवश्यक!)

या स्टेप्स फॉलो करून करा तुमच्या आधार कार्डवरील Address  अपडेट

  • सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
    https://uidai.gov.in/
  • यानंतर तुम्ही My Aadhaar Menu या पर्यायामध्ये जा आणि update your aadhaar option यावर क्लिक करा.
  • अपडेट डेमोग्राफिक डेटा ऑनलाइन यावर क्लिक करा यानंतर सेल्फ सर्विस अपडेट करणारे पोर्टल ओपन होईल.
  • याठिकाणी तुम्ही proceed to update aadhaar या पर्यायावर क्लिक करा आणि आधार नंबर, कॅप्चा कोड टाका.
  • यानंतर तुमच्या registered मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. OTP व्हेरिफाय करून अपडेट डेमोग्राफिक डेटावर क्लिक करा.
  • address ऑप्शनवर क्लिक करा यानंतर तुम्हाला नवीन पत्ता टाकावा लागेल आणि डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. Proceed करण्याआधी सर्व माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करावी.
  • पेमेंट सेक्शन ओपन झाल्यावर तुम्हाला ५० भरावे लागतील. Application फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी. तुम्हाला URN नंबर मिळेल या नंबरद्वारे तुम्ही आधार स्टेटस ट्रॅक करू शकता.

या संपूर्ण स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे आधार कार्ड सहज अपडेट करू शकता. UIDAI ने घराचा पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. वरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या घराच्या पत्त्यात बदल होईल. यानंतर तुम्ही अपडेटेड आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.