HR Manager : ऑफिसमध्ये नोकरीच्या मुलाखती घेण्याबरोबरच एचआर अधिकाऱ्याला ‘ही’ कामंही असतात

HR Manager : प्रत्येक कार्यालयात मनुष्यबळ विकास अधिकारी किती महत्त्वाची भूमिका निभावत असतो माहीत आहे?

128
HR Manager : ऑफिसमध्ये नोकरीच्या मुलाखती घेण्याबरोबरच एचआर अधिकाऱ्याला ‘ही’ कामंही असतात
HR Manager : ऑफिसमध्ये नोकरीच्या मुलाखती घेण्याबरोबरच एचआर अधिकाऱ्याला ‘ही’ कामंही असतात
  • ऋजुता लुकतुके 

कुठल्याही कार्यालयात मुलाखतीसाठी किंवा कामाच्या दिवशी पहिल्यांदा गेलात तर स्वागत कक्षातील मुलीनंतर पहिला व्यक्ती तुम्हाला भेटतो तो मनुष्यबळ विकास अधिकारी किंवा एचआर असतो. अनेकदा फक्त मुलाखतीच्या वेळीच या व्यक्तीशी आपली गाठभेठ होते. सुटी मागताना किंवा पगाराचा ईमेल येतो तेव्हा या अधिकाऱ्याचं नाव आपल्यासमोर येत राहतं. पण, हा अधिकारी कार्यालयातील दैनंदिन घडामोडींमध्ये इतरही महत्त्वाच्या भूमिका निभावत असतो. निदान पदवी परीक्षेनंतर करियरचा विचार करणाऱ्या लोकांनी एचआरचं कार्यालयातील योगदान समजून घेतलं पाहिजे. कारण, सध्या सगळ्याच कंपन्यांना एचआर एक्झिकिटिव्हची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. (HR Manager)

(हेही वाचा- Mumbai Crime News : रुग्णांना बरे करण्याची १०० टक्के गॅरंटी देणाऱ्या चार भामट्यांना पकडले)

एचआर हा नोकरदार व्यक्ती आणि ती कंपनी तसंच मोठे अधिकारी यांच्यातील दुवा असतो. आणि वर सांगितल्या प्रमाणे फक्त मुलाखती आयोजित करणे आणि उमेदवारांकडून माहिती भरून घेणे याहून कितीतरी अधिक महत्त्वाची कामं एचआर अधिकारी करत असतो. (HR Manager)

१. कंपनीतील वेगवेगळ्या आवश्यक कामांसाठी सुयोग्य उमेदवारांची नेमणूक करणं हे एचआर व्यक्तीचं प्राथमिक आणि मूलभूत काम आहे. शिवाय या उमेदवाराची सर्व माहिती ठेवणं आणि व्यक्तीला वेळेवर पगार मिळेल आणि इतर सुविधाही वेळेत मिळतील याची सोय करणं हे एचआरचं पहिलं काम आहे.

२. विशिष्ट कामाचं प्रोफाईल तयार करणं हे एचआरचं आणखी एक महत्त्वाचं काम आहे. एखाद्या पदावरील व्यक्ती नेमकं काय काम करेल, त्यासाठी व्यक्तीची शैक्षणिक व इतर पात्रता काय असली पहिजे, त्यांच्यावर कामाच्या काय जबाबदाऱ्या असतील आणि त्यातून उमेदवार आणि कंपनीचं हित कसं साधलं जाईल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी एचआर अधिकाऱ्याची असते.

३. कंपनीत होणारे विविध कार्यक्रम आणि कामांचं वेळापत्रक तयार करणं, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा ठरवणं आणि त्यांचं पालन होतंय की नाही हे पाहणं हे एचआरचं महत्त्वाचं काम आहे. कंपनीत कामाच्या व्यतिरिक्त साजरे होणारे सण, कार्यक्रम यांचं आयोजनही एचआरकडेच असतं.

४. कर्मचाऱ्याची नियुक्ती, तो कंपनीत नीट रुळला आहे की नाही याची तपासणी आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण यांचं नियोजनही एचआर अधिकारी करतो.

५. कर्मचाऱ्यांनी पालन करायचे नियम आखणं आणि त्यांचं पालन सुनिश्चित करणं ही एचआर अधिकाऱ्याची जबाबदारी आहे

६. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं, त्याचं योग्य मूल्यमापन करणं आणि आवश्यक तिथे कामगिरीविषयी त्यांना अवगत करणं हे एचआरचं काम आहे

७. कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देणं हे एचआरचं काम आहे.

८. कर्मचारी वर्गात तसंच कनिष्ठ व वरिष्ठ गटात होणारी भांडणं सोडवणं आणि भांडणं सोडवण्यासाठी एक यंत्रणा व व्यवस्था उभारणं हे एचआर अधिकाऱ्याचं काम आहे

९. कर्मचाऱ्यांचं आरोग्य व सुरक्षितता यांची जबाबदारीही एचआरकडे असते

१०. कर्मचाऱ्याला चांगली वर्तणूक आणि चांगली कामगिरी यासाठी मोबदला देणं हे एचआर अधिकाऱ्याचं काम आहे

११. कर्मचाऱ्याची कामगिरी, वर्तन, सुट्या या सगळ्यांची नोंद ठेवणं हे एचआर अधिकाऱ्याचं काम आहे

१२. कंपनीत नेतृत्व गुण असलेल्या व्यक्ती हेरणं आणि त्यांना तयार करणं हे एचआर अधिकाऱ्याचंच काम आहे

१३. कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सुविधा आणि सोयी त्यांना वेळेवर आणि नीट मिळतात ना हे पाहणं ही एचआर अधिकाऱ्याचीच जबाबदारी आहे.

(हेही वाचा- Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट; म्हणाले…)

एचआर हा व्यवस्थापकीय अभ्यासक्रमातील एक भाग आहे. या विषयात एमबीए केलं असेल तर तुम्हाला आणखी चांगली नोकरी मिळू शकते. (HR Manager)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.