Hudco Share Price : अर्थसंकल्पानंतर या शेअरमध्ये १२ टक्क्यांची पडझड, जाणकारांचा काय आहे होरा?

Hudco Share Price : हुडको कंपनीला सरकारी निधी कमी केल्याचा फटका बसला आहे

123
Hudco Share Price : अर्थसंकल्पानंतर या शेअरमध्ये १२ टक्क्यांची पडझड, जाणकारांचा काय आहे होरा?
Hudco Share Price : अर्थसंकल्पानंतर या शेअरमध्ये १२ टक्क्यांची पडझड, जाणकारांचा काय आहे होरा?
  • ऋजुता लुकतुके 

हुडको ही सरकारी क्षेत्रातील शहरी गृहनिर्माण प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. पण, अलीकडेच केंद्रसरकारने अर्थसंकल्पात शहरी आवास योजनांसाठीच्या निधीत कपात केल्यानंतर या शेअरमध्ये वरच्या पातळीवरून सातत्याने घसरण झाली आहे. मागच्या एका महिन्यात देशी म्युच्युअल फंड कंपन्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असली तरी परदेशी गुंतवणूक कंपन्या आणि किरकोळ गुंतवणूकदारांनीही शेअरकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, मागच्या मागच्या महिनाभरात शेअरमध्ये १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतरच्या पडझडीतून आता शेअर सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर 206 अंशांवर बंद झाला. पण, त्याच्या वर्षभरातील उच्चांकापेक्षा तो ५० टक्क्यांनी खाली आहे. (Hudco Share Price)

(हेही वाचा- Peter England : नावावरून परदेशी वाटणारा आणि जागतिक दर्जाचा असा अस्सल भारतीय फॅशन ब्रँड)

प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या सरकारी निधीत कपात केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पादरम्यान केल्यावर हुडकोच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. आणि शेअर काही मिनिटांतच सोमवारी १० टक्क्यांच्या घसरणीसह १९२ रुपयांवर पोहोचला. सुरुवातीला शेअरला लोअर सर्किटही लागलं होतं. पंतप्रधान आवास निधीसाठी नवीन आर्थिक वर्षांत केंद्राकडून आता १९,७९४ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पूर्वी हा निधी ३०,१७१ कोटी रुपये इतका होता. या तरतुदीत यंदा ३४ टक्क्यांची तफावत असल्यामुळे गुंतवणुकदारांना हे मानवलं नाही. (Hudco Share Price)

Pic Courtesy@Twiteer 17

शेअर बाजार विश्लेषकांनीही हुडकोबद्गल किरकोळ गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बांधकाम उद्योगातील शेअरना सध्या फारशी मागणी नाही. त्याचाही फटका या शेअरला बसणार आहे. आणि वार्षिक उच्चांकानंतर ४२ टक्क्यांहून जास्त पडझड झालेला हा शेअर सध्या सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी घाई घाईने यात गुंतवणूक करू नये असा इशारा मोतीलाल ओस्वाल संशोधन संस्थेच्या शिवांगी सारडा यांनी म्हटलं आहे. या शेअरमध्ये विक्रीचा प्रभाव दिसत असल्यामुळे नवीन खरेदीसाठी थोडी वाट बघावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. (Hudco Share Price)

गेल्यावर्षी जुलै महिन्यात हुडकोने ३५३ रुपयांचा वार्षिक उच्चांक नोंदवला होता. पण, त्यानंतर शेअरमध्ये पडधड दिसून आली आहे. (Hudco Share Price)

(हेही वाचा- नागपूरमध्ये Bird Flu चा शिरकाव ; पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.