Hyundai Tucson 2024 : नवीन ताकदवान इंजिन आणि बदललेलं रुपडं घेऊन आली नवीन ह्युंदाई टक्सन २०२४ गाडी

Hyundai Tucson 2024 : भारतात २९ लाखांपासून गाडीची किंमत सुरू होणार आहे 

25
Hyundai Tucson 2024 : नवीन ताकदवान इंजिन आणि बदललेलं रुपडं घेऊन आली नवीन ह्युंदाई टक्सन २०२४ गाडी
Hyundai Tucson 2024 : नवीन ताकदवान इंजिन आणि बदललेलं रुपडं घेऊन आली नवीन ह्युंदाई टक्सन २०२४ गाडी
  • ऋजुता लुकतुके 

ह्युंदे गाडीच्या लोकप्रिय टक्सन या एसयुव्ही गाडीची चौथी पिढी अधिकृतपणे जगभरात लाँच झाली आहे. आता भारतीय बाजारपेठेसाठीही गाडी सज्ज झाली आहे. २०२४ च्या अखेरीस अधिकृतपणे गाडी भारतात लाँच होईल. त्यापूर्वी ही गाडी नेमकी कशी दिसते याचं दर्शन कंपनीने भारतीयांना नुकतंच घडवलं आहे. यात गाडीच्या इंटिरिअरमध्ये बऱ्यापैकी बदल करण्यात आले आहेत. तर बाहेरूनही गाडीचा लुक बदललेला दिसेल. आतमध्ये गाडीचं नवीन स्टिअरिंग व्हील, दुहेरी डिजिटल स्क्रीन आणि बदललेला डॅशबोर्ड तुमचं स्वागत करेल. गाडीचे मुख्य हेडलाईट बसवलेलं ग्रीलही आता बदलण्यात आलंय. नवीन ग्रील आधुनिक, रुंद आणि हेडलाईटचा आकारही बदलला आहे. (Hyundai Tucson 2024)

(हेही वाचा- Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक)

महत्त्वाचे बदल झालेत ते केबिनमध्ये. नवीन टक्सनमध्ये दोन डिजिटल स्क्रीन आहेत. यातील एक चालकासमोर आणि दुसरी अर्थातच इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. या स्क्रीनवरच क्लायमॅट कंट्रोलची यंत्रणा देण्यात आली आहे. गाडीचं सनरुफ पॅनोरमिक आहे. चालकाला मदत करणारी एडीएएस यंत्रणा तसंच ३६० अंशांचा कॅमेराही बसवण्यात आला आहे. चालक आणि सहप्रवाशांसाठी ६ एअरबॅग बसवण्यात आल्या आहेत. (Hyundai Tucson 2024)

 ही गाडी टर्बो पेट्रोल, डिझेल आणि हायब्रीड अशा तीन प्रकारांत उपलब्ध असेल. भारतात २ लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेली मॉडेल सुरुवातील विक्रीसाठी येतील. नवीन टक्सन गाडी ही प्रिमिअर श्रेणीतील असेल. आणि २९ लाख रुपयांपासून तिची किंमत सुरू होईल. २०२४ च्या अखेरीस ही गाडी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. (Hyundai Tucson 2024)

(हेही वाचा- सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल)

गेल्यावर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं एका ऑटोशोमध्ये ही गाडी पहिल्यांदा जगाने पाहिली. त्यानंतर आधी युरोप, अमेरिका आणि आता भारतीय बाजारपेठेत ही गाडी प्रवेश करणार आहे. क्रेटा आणि व्हेन्यू या आधीच लोकप्रिय असलेल्या एसयुव्ही गाड्यांबरोबरच आता ह्युंदे कंपनी टक्सनला भारतात पुन्हा आणत आहे.  (Hyundai Tucson 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.