कोणत्या प्रदेशात मागील आठवड्यात १८००० भूकंपाचे धक्के बसले? जाणून घ्या… 

दक्षिण - पश्चिमी आइसलँड येथे मागील ८०० वर्षे ज्वालामुखी शांत होता, मात्र आता हा कालावधी संपुष्टात आला असून येथे मागील आठवड्यात १८००० वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण सर्व जण मजेत राहत असतो, पण त्याच पृथ्वीच्या भूगर्भात महाभयंकर उलथापालथ होत असते. त्यामुळे पृथ्वीच्या एखाद्या भागातील पृष्ठभागात इंचाने जरी हालचाल झाली तरी त्या भागात हल्लकल्लोळ माजतो. मात्र विचार करा एखाद्या ठिकाणी अशी हालचाल एक-दोन-तीन वेळा नव्हे तर आठवड्यात १८ हजार वेळा आणि दिवसाला २,५०० वेळा अर्थात भूकंपाचे धक्के बसत असतील तर, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जीवन किती बाधित होत असेल. पण असे वास्तवात घडले आहे. दक्षिण – पश्चिमी आइसलँड येथे मागील ८०० वर्षे ज्वालामुखी शांत होता, मात्र आता हा कालावधी संपुष्टात आला असून येथे मागील आठवड्यात १८००० वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

इथे भूपृष्ठावरील दोन खंड एकमेकांना धडकतात!

भूगर्भशास्त्रज्ञ यांच्या मते या प्रकारामुळे केवळ आइसलँड हाच भाग प्रभावित झाला आहे, त्याचा जगावर विशेष परिणाम होणार नाही. आइसलँड येथे भूकंपाचे धक्के बसणे ही साधारण घटना आहे. कारण या प्रदेशाच्या दोन्ही दिशेने उत्तर अमेरिका आणि यूरेशियन हे दोन खंड आहेत. जे मध्य अटलांटिक सागरातील पर्वतरांगांनी विभागलेले आहेत. याठिकाणी भूगर्भातील लाव्हा तापल्याने हे दोन खंड एकमेकांना धडकतात, परिणामी भूकंपाचे धक्के बसतात.

आइसलँड येथील दोन भूपृष्ठावरील खंड (प्लेट्स) एकमेकांना धडकत असल्याने हे भूकंपाचे धक्के बसत असून त्यातून लाव्हा बाहेर पडत आहे.
– फ्रेस्टीन सिग्मउंडसून, प्रोफेसर, आइसलँड विद्यापीठ

५.७ रिस्टल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले! 

२४ फेब्रुवारी रोजी हे भूकंपाचे धक्के ५.७ रिस्टल तीव्रतेचे होते. या दिवशी एकाच दिवशी तब्बल २५०० भूकंपाचे धक्के बसले, असे आइसलँड हवामान खात्याने सांगितले. त्यानंतर गुरुवारी, २५ फेब्रुवारी रोजी पहिल्या एका तासात ८०० धक्के बसले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here