जगाचे वयोमान सत्तरीत; वाचा काय आहे कारण…

जागतिक आरोग्य संघटनेची भीती

कोरोनाच्या सावटाखाली आजही संपूर्ण जग मृत्यूच्या भीतीत जगत आहे. कोरोनात मधुमेहींना जास्त त्रास झाला. मधुमेह आटोक्यात आला नाही तर जगभरातील माणसाचे वयोमान सत्तरीतपर्यंत मर्यादित असेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

माणसांच्या मृत्यूचं कारण…

चाळीस वर्षांपूर्वी जगभरात केवळ १८० दशलक्ष मधुमेहग्रस्त रुग्ण होते. २०१४ साली ४२२ दशलक्ष रुग्णांची भर पडल्याची जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगतेय. जगभरात १.५ दशलक्ष रुग्णांचा मधुमेहाने मृत्यू होतोय, ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या असंसर्गजन्य आजार विभागाच्या बॅनेट मिक्सन यांनी मधुमेहाच्या जनजागृतीपर कार्यक्रमात दिली. जगभरात माणसांच्या मृत्यूच्या कारणामागे मधुमेह हे नवव्या स्थानावर आहे. मात्र मध्य आशियातील मधुमेहाची स्थितीबाबत मिक्सन यांनी चिंता व्यक्त केली.

(हेही वाचा – प्रत्येक सहापैकी एका भारतीयाला मधुमेह)

मधुमेह नियंत्रित राहिला नाही तर…

जागतिक पातळीवर मधुमेह टाईप २ जास्त धोकादायक होत चालला आहे, अशी प्रतिक्रिया जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य योजना विभागाचे किऊ-टॅ-टाऊ यांनी दिली. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित व्यायाम आणि पथ्य पाळावे. तरीही शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित न राहिल्यास औषधे आणि इन्सुलिनची गरज भासू शकते, असेही किऊ-टॅ-टाऊ यांनी दिली. मधुमेह नियंत्रित राहिला नाही तर अंधत्व, किडनीचे विकार, हृदयाचा इटका, स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. मधुमेहाच्या वाढत्या संख्येमुळे जग मधुमेहाच्या त्सुनामीच्या अर्ध्या पातळीवर आहे, असे असंसर्गजन्य विभाग, जागतिक आरोग्य संघटनेच्या बॅनेट मिक्सन यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here