पॅन कार्ड हे भारतीयांचे महत्त्वाचे ओळखपत्र समजले जाते. विशेषत: आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड गरजेचे असते. आयकर विभागाने सुद्धा आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड हे अनिवार्य केले आहे. तुम्हाला एका दिवसात ५० हजारांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार करायचे असल्यास पॅन कार्ड आवश्यक असते.
( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)
पॅन कार्ड हा संपूर्ण भारतातील करदात्यांना दिलेला एक ओळख क्रमांक असतो. आता तुमच्या पॅन कार्ड तुमचे आधार कार्ड सुद्धा लिंक आहे. पॅन कार्डवर तुमचा क्रमांक, कार्डधारकाचे नाव, जन्मतारीख आणि छायाचित्र असते त्यामुळे एक व्यक्ती केव्हाच दुसऱ्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही असे केल्यास काय होईल ?
१० हजार रुपयांचा दंड
भारतातील प्रत्येक व्यक्तीला एकच पॅन कार्ड दिले जाते. भारतीय नागरिक एक किंवा जास्त पॅन कार्ड काढू शकत नाही तसे केल्यास संबंधित व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२B अंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवल्याबद्दल संबंधित व्यक्तीला १० हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन कार्डचे वाटप केले असल्यास त्याने लगेच अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करावे अशाप्रकारे संबंधित व्यक्तीला दंड टाळता येऊ शकतो असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community