…तर तुमचे पॅन कार्ड होणार रद्द, केंद्र सरकारचा निर्णय

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता अंतिम तारीख देण्यात आली आहे. येत्या 30 जूनपर्यंत नागरिकांना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागरिकांनी असे न केल्यास आता पॅन कार्डच रद्द करण्याचा कठोर निर्णय घेण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पॅन-आधार लिंक करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

पॅन कार्ड होऊ शकते रद्द

30 जून 2022 पर्यंत पॅन कार्डला बायोमेट्रिक आधार कार्डशी लिंक करता येत आहे. ही मुदत वाढवून देण्यात आली असल्यामुळे नागरिकांना त्यासाठी आता 500 रुपये दंड भरावा लागत आहे. पण 30 जूनच्या नंतर पॅन-आधार लिंकिंग करायचे असल्यास ही दंडाची रक्कम एक हजार रुपये होणार आहे. यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत नागरिकांना पॅन कार्डला आधार कार्ड जोडता येणार आहे. मात्र, तोपर्यंत ज्या नागरिकांनी लिंकिंग केले नसेल त्यांचे पॅन कार्ड 31 मार्च 2023 नंतर रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः Incom Tax Return: टॅक्स भरताना ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर भरावा लागेल मोठा दंड)

असे होणार नुकसान

पॅन कार्ड रद्द झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण आजकाल सर्वच ठिकाणी पॅन कार्डचा वापर ओळखपत्राचा पुरावा म्हणून करण्यात येतो. तसेच बँक खाते उघडण्यासाठीही पॅन कार्डचा वापर करण्यात येतो. पॅन कार्ड रद्द झाल्यास म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटशी संबंधित अकाऊंटही अवैध ठरवण्यात येऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here