आधार कार्ड भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे सर्व महत्वाच्या कामकाजांमध्ये आधार कार्ड अनिवार्य असते. आधार कार्ड महत्वाचे दस्तऐवज असल्यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. लग्न झाल्यावर अनेक मुलींचे नाव बदलले जाते अशावेळी आणि तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये बदल करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइन बदल करू शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. हे काम घरात बसून करता येते. लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी, वापरकर्त्यांना अधिकृत विवाह प्रमाणपत्र, आधारभूत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : एकदाच चार्ज करा, २०० किमीपर्यंत स्कूटर फिरवा )
असे करा तुमचे आधार कार्ड अपडेट
- uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
- माय आधार या पर्यायावर क्लिक करा आणि अपडेट डेमोग्राफिक्स डेटावर (Online) जा.
- नवीन टॅब ओपन करून proceed to update aadhaar या पर्यायावर क्लिक करा
- आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड समाविष्ट करा त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.
- ओटीपी प्रविष्ट केल्यावर अपडेट डेमोग्राफिक्स डेटावर क्लिक करा.
- यानंतर आवश्यक बदल करा
- तुम्हाला कागदपत्रे उदाहरणार्थ पॅनकार्ड, पासपोर्ट या पुराव्यांची प्रत सबमिट करावी लागेल.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आणि योग्य तपशील प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल.
- यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला अंतिम पावती मिळेल.