जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात अनेक लोक सहलीसाठी घराबाहेर पडतात. उत्तर भारतातील बर्फाच्छादित प्रदेश, समुद्र, चहा-कॉफीचे मळे पर्यटकांना कायम आकर्षित करतात. जर तुम्ही सुद्धा कॉफीचे चाहते असाल तर, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला भेट द्यायला नक्की आवडेल.
वायनाड
केरळमधील वायनाड हे एक सुंदर ठिकाण आहे. येथे लोक अनेकदा फिरायला जातात. हे ठिकाण भारतातील सर्वोत्तम कॉफी ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही येथील हिरव्यागार कॉफीच्या मळ्यांचा आनंद घेऊ शकता.
कूर्ग व चिकमंगळूर
कूर्ग हे कर्नाटकमधील लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे. याभागात अरेबिसीया आणि रोबस्ता या कॉफी बिया तयार करणारे अनेक कॉफी गार्डन्स आहेत. कर्नाटकातील चिकमंगळूरमध्येही विविध कॉफी गार्डन्स आहेत.
( हेही वाचा : शिवकालीन ऐतिहासिक वास्तू धोक्यात! )
अर्कू
अर्कू हे आंध्र प्रदेशातील एक सुंदर ठिकाण आहे याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील हजारो आदिवासी कॉफीच्या शेतीवर अवलंबून आहेत. तुम्ही कधीही अर्कूला जात असाल तर इथल्या स्थानिकांनी पिकवलेल्या सेंद्रिय कॉफीचा आस्वाद नक्की घ्या.
यारकौड
यारकौड तामिळनाडूमध्ये आहे. यारकौडला दक्षिण भारतातील कॉफी रत्न म्हटले जाते. तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर, या निसर्गरम्य ठिकाणांना अवश्य भेट द्या.
Join Our WhatsApp Community