प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार रात्रीची झोप घेतात. काहीजण, थोड्याशा प्रकाशात झोपतात तर काही गडद अंधारात एकही दिवा न लावता झोपतात. तुम्हाला जर दिव्याच्या उजेडात झोपायची सवय असेल तर तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. असा निष्कर्ष अमेरिकेतील नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे.
( हेही वाचा : अबब! अडीच लाखांना एक आंबा )
मधुमेहाचा धोका
नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. माणूस झोपल्यामुळे पापण्या मिटलेल्या असतात. दिव्याच्या उजेडात झोपल्यामुळे डोळ्यांवर थेट प्रकाश पडतो यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळेच रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात झोपल्यामुळे हृदयरोग व टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका संभावतो. असे शास्त्रज्ञांनी या संशोधनाच्या निष्कर्षात स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत संशोधन
अमेरिकेत संशोधनात सामील झालेल्या लोकांपैकी जे लोक रात्री दिव्यांच्या प्रकाशात झोपते होते त्यांच्या हृदयाचे ठोके अंधारात झोपलेल्या लोकांच्या तुलनेत वाढले होते. त्यामुळे भविष्यात अशा लोकांचे अकाली निधन होण्याचाही धोका असतो. तसेच दिव्याच्या प्रकाशात झोपलेल्या व्यक्तींच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याचे या संशोधनात दिसून आले. त्यामुळे दिव्याच्या प्रकाशात झोपल्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका संभवतो.
Join Our WhatsApp Community