गरम गरम चहा पिताना किंवा एखाद्या पदार्थाचा घास घेताना पटकन तोंड भाजते अथवा जीभ पोळते. म्हणूनच असे म्हटले जाते की जास्त गरम अन्न खाणे हानिकारक आहे. जीभ भाजल्यामुळे खाणे, पिणे आणि बोलण्यात खूप त्रास होतो. अशा स्थितीत जीभ ताबडतोब दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक ठरते. जीभेला बरे करण्यासाठी, आपल्याला सामान्यतः बाजारात औषधे मिळतात, परंतु काही घरगुती उपाय आहेत जे जीभेच्या जळजळीपासून आराम देऊ शकतात. (Health Tips)
थंड पाणी पिणे :-
जीभ भाजल्यास, हळू हळू थंड पाणी पिल्याने जळजळ होण्यापासून आराम मिळतो. थंड पाणी जिभेच्या भाजलेल्या भागाला थंड करते, त्यामुळे जळजळ कमी होते. याशिवाय थंड पाण्यात बुडवलेले बर्फाचे तुकडे चोखल्यानेही जीभेची जळजळ शांत होते. थंड पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने जळजळ आणि वेदना कमी होतात. त्यामुळे जीभ भाजल्यास थंड पाण्याचा वापर प्रभावी ठरतो. (Health Tips)
(हेही वाचा – Sanjay Singh : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात संजय सिंग यांचा संबंध; काय म्हणाले न्यायालय?)
तूप :-
जीभ भाजल्यास त्यावर तुपाचा पातळ थर लावल्याने जळजळीपासून आराम मिळतो. याशिवाय तुपात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जिभेच्या भाजलेल्या भागाला संसर्गापासून वाचवतात. (Health Tips)
मीठाच्या पाण्याने गुळण्या करा :-
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास जिभेची सूज कमी होते आणि वेदनाही कमी होतात. (Health Tips)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community