Imagica mumbai : मुंबईतील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये करा खूप मस्ती!

120
Imagica mumbai : मुंबईतील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये करा खूप मस्ती!

इमॅजिका वॉटर पार्क हे मुंबई आणि पुण्याजवळच्या खोपोली येथे असलेलं एक लोकप्रिय वॉटर थीम पार्क आहे. या थीम पार्कमध्ये सुंदर ग्रीकचं एक शहर मायकोनोज या शहारासारखं डिझाइन केलं आहे. हे इतकं लॅविश आणि सुंदर आहे की, इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे एखादं परदेशातलं ठिकाण असल्याचा अनुभव मिळतो.

या वॉटर पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रिलिंग वॉटर राईड्स आहेत. अशा राईड्स तुम्ही कधीही पहिल्या नसतील. इथलं पाणी स्वच्छ आणि निळेजर्द आहे. तुम्हाला लेझी रिव्हर रिलॅक्सेशन हवं असेल तर तुम्ही इथला स्प्लॅश वॉटर स्लाईड हा पर्याय निवडू शकता. तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. (Imagica mumbai)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana चे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये महिलांची गर्दी)

जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्समध्ये थ्रिल हवं असेल तर तुम्ही लूपी-वूपी राईडची निवड करू शकता. ही राईड म्हणजे राईड प्लस रेसिंग अशी आहे. त्यामुळे तुम्हाला एक थ्रिलिंग अनुभव येतो. या पार्कमध्ये एनर्जेंटिक एक्वा लहरी, हॅपनिंग म्युझिक आणि मोठ्या वेव्ह पूलचादेखील आनंद तुम्ही घेऊ शकता. राईड्सव्यतिरिक्त इथलं थीम पार्कही तुम्हाला नक्कीच आवडेल. तसंच इथल्या रेस्टॉरंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं उत्कृष्ट अन्न आणि ड्रिंक्सही मिळतात.

इमॅजिका वॉटर पार्क हे इमॅजिका ॲम्युझमेंट थीम पार्कला लागूनच आहे. तसंच हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात सह्याद्रीच्या सुंदर डोंगर रांगांमध्ये वसलेलं आहे. इमॅजिका हे इथल्या परिसरातल्या इतर कोणत्याही वॉटर पार्कपेक्षा अतिशय निराळं आहे. मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या लोकांसाठी इथे यायला अनेक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. इथे येण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे. या मार्गावरून तुम्ही जवळपास दीड तासात इथे पोहोचू शकता. (Imagica mumbai)

(हेही वाचा – Golden Chariot या लक्झरी ट्रेनचे तिकीट भाडे किती आहे? आणि काय काय सुविधा मिळतात?)

इमॅजिका वॉटर पार्क मुंबई उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा :

थीम पार्क

पार्कची वेळ

सकाळी १०.३० ते संध्याकाळी ०७.३० पर्यंत

राईड्सची वेळ

सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०६.०० पर्यंत

(हेही वाचा – tikona fort : तिकोना किल्ला का आहे इतका प्रसिद्ध?)

वॉटर पार्क

पार्कची वेळ

सकाळी १०.३० ते संध्याकाळी ०६.०० पर्यंत

राईड्सची वेळ

सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० पर्यंत

इमॅजिका इन मुंबई वॉटर पार्क हे वर्षातले ३६५ दिवस सुरू असतं.

इमॅजिका वॉटर पार्क मुंबई – प्रवेश शुल्क (प्रति व्यक्ती) (Imagica mumbai)

  • थीम पार्क ₹९९९
  • वॉटर पार्क ₹६९९
इमॅजिका वॉटर पार्क मुंबई- ड्रेस कोड

वॉटर राईडसाठी १००% नायलॉन किंवा सिंथेटिक मटेरियलचे कपडे म्हणजे टी-शर्ट, शॉर्ट्स, बर्म्युडा, थ्री-फोर्थ, स्विमसूट वापरणं बंधनकारक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.