मान्सूनमध्ये ट्रेकिंगचा प्लॅन करताय? ही आहेत महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणे

मान्सून सुरु झाल्यावर अनेक जण डोंगराळ भागात ट्रेकिंग प्लॅन करतात. पाऊस आणि ट्रेकर्स यांचे नाते म्हणजे जिवाभावाचे. पावसात ट्रेकर्स भटकंती करत, मनसोक्त भिजतात. पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील काही बेस्ट ठिकाणे जाणून घेऊया.

कोंडेश्वर मंदिर- बदलापूर

येथे निसर्गाची खरी सुंदरता पाहायला मिळते ती जागा म्हणजेच कुंडेश्वर. ट्रेकर्ससाठी ही बेस्ट जागा आहे. माॅन्सून काळात भेट देण्यासाठी ही सर्वात उत्तम वेळ आहे. बदलापूरमार्गे-खारवाई-भोज-कांडेश्वर, रेल्वेमार्गे येथून बदलापूर पूर्व स्टॅंडवरुन रिक्षा भाड्याने घेऊ शकतो.

भेट देण्याची ठिकाणी – शिव मंदिर, कोंडेश्वर धबधबा, भोज धरण व तलाव, डाॅक्टर धबधबा.

दिंडीगड शिवमंदिर -भिवंडी

नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या 2500 फूट उंचीवर वसलेले साहसी स्थान, दिंडीगड शिवमंदिर सोनाळे भिवंडी, कल्याणपासून अवघ्या 13-14 कि.मी. आणि 1 तासाच्या अंतरावर आहे. हे खूप छान ठिकाण आहे.  संध्याकाळी तर इथे सर्वत्र धुके असते. सर्व प्रकारच्या गाड्या मंदिराच्या पायथ्याशी जाऊ शकतात.

मुंबई ते दिंडीगड सोनाळे भिवंडी अंतर- 84.5 किलोमीटर.

इगतपुरी (Igatpuri hill station)

इगतपुरी हे मुंबईपासून 130 किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाटातील एक हिल स्टेशन आणि शहर आहे. मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर स्थित इगतपुरी हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. त्यात सह्याद्री रेंजची सर्वात उंच शिखरे देखील आहेत.

फोटोग्राफर आणि निसर्गप्रेमींसाठी इगतपुरी नद्यांचा आणि धबधब्यांनी सजवलेल्या भातसा नदी व्हॅली, उंट व्हॅली, कोंकणकडा खोरे आणि रंधा धबधबा बघायला मिळतो. ट्रेकर्ससाठी इगतपुरी 3000 फूट उंचीवर त्रांगलवाडी किल्ला आहे. गडावरील मोहक दृश्य तुम्ही अनुभवू शकता.

कर्नाळा किल्ला- पनवेल (Karnala fort Panvel)

पनवेल शहरापासून 10 किमी आणि मुंबईपासून 65 किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ला हा डोंगराळ किल्ला आहे. हा किल्ला एक संरक्षित मालमत्ता आहे जो कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आहे आणि एक रिफ्रेश, सोपी ट्रेकचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम संधी आहे. अधिक साहसी ट्रेकर्ससाठी किल्ल्याच्या शिखरावर शाॅर्टकट आहे. हा मार्ग खूपच उंच आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here