…अन् साप झाला टल्ली!

93

एरव्ही माणसाला न सुटणा-या सवयींमध्ये दारुचा उल्लेख होत असताना, आता वन्यजीवही दारुच्या बाटलीत रमत असल्याचं अजब चित्र मुंबईत पाहायला मिळालं. मुंबईत आरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात व नजीकच्या परिसरात आढळून येणा-या धमण हा बिनविषारी सापानं चक्क बिअरच्या कॅनमध्येच डोकं घुसवलं. धमण बिअरच्या कॅनमध्ये अडकल्याचा किस्सा नुकताच गोरेगावला घडला.

सापाला बाहेर काढण्यात यश

गोरेगावच्या साईबाबा संकुलाच्या परिसरात हा किस्सा पाहताच रहिवासी आणि सर्पमित्रही चाट पडले. नशिबानं बिअरचा कॅन रिकामी असल्यानं सर्वांनी सुस्कारा सोडला. मात्र सापाच्या वळवळणा-या हालचाली बघून साप टल्लीच झालाय, अशा विनोदी प्रतिक्रिया रहिवासी संकुलात सुरु होत्या.साईबाबा संकुल या रहिवाशी संकुलातील सदस्यांनी दुपारी इमारतीतील अडगळीच्या ठिकाणी साप बिअरच्या बाटलीत अडकल्याचं पाहिलं. साप कोणता याबाबत कल्पना नसल्यानं रहिवाशी चांगलेच हादरले. त्यात साप विषारी की बिनविषारी  याबाबत माहिती नसल्यानं, घाबरलेल्या रहिवाशांनी स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्लाइल्स एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेला मदतीसाठी संपर्क केला. संस्थेचे सर्पमित्र तन्मय जोशी यांनी अत्यंत चपळाईने सापाची रिकाम्या बाटलीतून सुटका केली. सापाला इजा होऊ नये, यासाठी पंधरा मिनिटांत अलगदपणे त्याला बिअरच्या रिकाम्या बाटलीतून बाहेर काढलं गेलं.

हे वन्यजीवांसाठी धोकादायक

साप बिअरच्या बाटलीत दिसणं हा प्रकार पाहताचक्षणी विनोदी असला तरीही याबाबत गंभारपणे पाहायला हवं. आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असलेल्या जंगल परिसरानजीकच्या रहिवाशी संकुलानी कच-याची योग्य विल्हेवाट लावावी. कच-याचं योग्य व्यवस्थापन नसणं हे वन्यजीवांसाठी धोक्याचं ठरु शकतं.

  (हेही वाचा :आता भंगारातूनही मिळणार कर सवलत! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.