सुंदर आहे हा पक्ष्यांचा बंगला…

141

प्रत्येक व्यक्तीला वाटते आपले हक्काचे घर असावे. अनेक जण स्वत:च्या आवडीप्रमाणे मोठमोठी आलिशान घरे बांधतात परंतु आज आम्ही तुम्हाला पक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अशाच एका आलिशान घराविषयी माहिती देणार आहोत. पक्ष्यांचा हा आलिशान बंगला राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात बांधण्यात आला आहे. हा बंगला ११ मजली असून या घरामध्ये पक्ष्यांच्या सोयीसाठी सर्व काळजी घेण्यात आली आहे. या बंगल्यात चक्क जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सुद्धा आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी )

१ हजार १०० पक्ष्यांची राहण्याची सोय

राजस्थानच्या बिकानेरमधील श्रीडुंगरगडच्या टोलियासर गावात पक्ष्यांसाठी हा बंगला बांधण्यात आला आहे. पक्षी या बंगल्यात येऊन घरटे बनवू शकतील अशा पद्धतीने याची रचना तयार करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या धान्य व पाण्यासाठीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा बंगला बांधण्यासाठी जवळपास पाच लाख रुपये खर्च आला असून घुमटाच्या आकारात बांधलेल्या या इमारतीत १ हजार १०० पक्षी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

bird house

या बंगल्यामध्ये हळूहळू पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. काही विशेष पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी यात मातीची घरे बनवून टांगण्यात आली आहेत. या घरांमध्ये पक्षी सहज प्रवेश करू शकतात. त्याचबरोबर तयार करण्यात आलेल्या जलतरण तलावात अनेक पक्षी येऊन आंघोळीचा आनंद घेऊ शकतात. या जलतरण तलावाचे पाणी बदलण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.