Amazon Prime, Hotstar,NetFlix मोफत हवंय? तर Jio देतंय हे भन्नाट प्लान

140

Reliance Jio ही सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी आहे. रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना अनेक प्रकारचे प्लान ऑफर करते. पण तुम्हाला जिओचा असा प्लान माहिती आहे का? ज्यात तुम्हाला OTT अॅप्सचे फायदे मिळू शकतील. Jio च्या या प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime video, Disney+ Hotstar, NetFlix चे मोफत Subscription मिळेल. एवढेच नाही तर प्लानमध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी भरपूर डेटा आणि अनलिमिटेड काॅलिंगचे फायदेही मिळणार आहेत.

( हेही वाचा: CSMT Railway Station : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे १३५ वर्षात ४ वेळा बदलले नाव )

‘हा’ आहे प्लान

Raliance Jio चा Rs.399 Postpaid plan अनेक OTT Apps Subscription सह येतो. याशिवाय यूजर्सना या प्लानमध्ये Unlimited Calls सुविधादेखील देण्यात आली आहे. या पोस्टपेड प्लस प्लानसह, तुम्हाला एसएमएस फायदे देखील दिले जातात.

रिलायन्स जिओचा हा पोस्टपेड प्लस प्लान 75GB high speed Data सह येतो. त्यानंतर 10/GB शुल्क आकारले जाईल. यामध्ये 200 GB Data rolover देण्यात आला आहे. या प्लानमध्ये कंपनी इंटरनॅशनल रोमिंगचा पर्यायही देते. यासोबत तुम्हाला अनेक जिओ अॅप्सचे फ्री सब्सस्क्रिप्शनही मिळते. जिओच्या या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या OTT फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये तुम्हाला Amazon Prime video, Disney+ Hotstar, NetFlix चे Subscription मिळेल. जर तुम्ही स्वत:साठी असाच OTT प्लान शोधत असाल, तर हा एक उत्तम प्लान ठरु शकतो.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.