तुमच्यामुळे कोणाला राग आला तर ‘या’ देशात होऊ शकतो तुरुंगवास

राग ही माणसाची स्वाभाविक भावना आहे. माणसाला कधी कोणत्या गोष्टीवरुन राग येईल हे काही सांगता येत नाही. बर्‍याचदा काही व्यक्तींमुळे आपल्याला राग येतो. काही लोकांचा चेहरा पाहिला तरी राग येतो. आपल्यामुळे अनेकांना राग येत असावा. अतिरिक्त प्रमाणातील राग हा शरीरासाठी चांगला नाही. जास्त राग आल्यावर ह्रदयविकार आणि स्ट्रोकची समस्या उद्भवते, असं एका अध्ययनातून समोर आलं आहे.

वर नमूद केल्यानुसार राग येणं ही माणसाची स्वाभाविक भावना आहे, मात्र जर तुमच्यामुळे कुणाला राग आला आणि तुम्हाला त्यासाठी तुरुंगात जावं लागलं तर या प्रकाराला काय म्हणाल? भारतात असा कायदा अस्तित्वात नसला तरी फिलिपिन्समध्ये आपल्यामुळे कोणाला राग आला तर तुरुंगाची यात्रा करावी लागते. फिलिपिन्समध्ये यासाठी विशेष कायदा देखील आहे.

(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ; वीर सावरकरांवर केली टीका)

फिलिपिन्स जगभरातील यात्रेकरुंसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. तुम्ही जर या देशात फिरायला जाणार असाल तर या कायद्याबाबत तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. हा कायदा १९३० रोजी अस्तित्वात आला. ज्यावेळी हा कायदा निर्माण करण्यात आला त्यावेळी असा विचार केला होता की, एखाद्या व्यक्तीला उगाच त्रास देणे, समोरच्याला राग येईल असं वागणे म्हणजे समोरच्याचं शोषण करण्यासारखं आहे. म्हणून अशा व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, असा विचार करुन या कायद्याची निर्मिती करण्यात आली.

त्या काळी ३ पाउंड आणि ३० दिवस तुरुंगवास अशी शिक्षा होती. आता यासाठी ७५ पाउंड म्हणजे सुमारे रु. ७५००/- दंड म्हणून भरावे लागतात. फिलिपिन्समध्ये अनेक यात्रेकरु जात असतात. म्हणून या कायद्यावर जगभरातून टीका झाली. त्यानंतर सरकारने या कायद्यात काही बदल केले, व्याख्या स्पष्ट केली की, एखाद्या व्यक्तीला मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने केलेली कृती या कायद्यांतर्गत येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here