Lifestyle : हाडांच्या बळकटीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थाचा समावेश, जाणून घ्या

174
Lifestyle : हाडांच्या बळकटीसाठी आहारात करा 'या' पदार्थाचा समावेश, जाणून घ्या
Lifestyle : हाडांच्या बळकटीसाठी आहारात करा 'या' पदार्थाचा समावेश, जाणून घ्या

सध्याचे युग हे धावपळीचे आहे. प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात यश मिळवण्यासोबत आरोग्याची जपणूकही करावी लागते. याकरिता दररोज आपण घेत असलेला आहार महत्त्वाचा आहे. हाडांच्या बळकटीसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश करणे आवश्यक आहे. सुकामेव्यात काजू खाणे हाडांच्या आरोग्याकरिता महत्त्वाचे मानले जाते,कारण काजूमध्ये फायबर, कार्ब्स, पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे बी 6 आणि मॅग्नेशियम असल्याने हाडे मजूबत होतात.

ठराविक वयानंतर महिलांची हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे कमकुवत हाडांची समस्या असेल,तर आहार काजूचा समावेश करावा. जाणून घेऊया, काजू खाण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे –

काजूमध्ये जीवनसत्त्व डी असते. त्यामुळे हाडे मजबूत व्हायला मदत होते. याकरिता एक कप पाणी घ्या. त्यामध्ये 6-7 काजू रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे काजू भिजलेले पाणि प्या. हे पाणी उपाशीपोटी प्यावे. काही दिवसांतच फरक दिसून येईल.

(हेही वाचा – Drugs In Raigad : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांची २०० पाकिटे सापडली; पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता)

– हाडांमधील कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी दुधामध्ये भिजवलेल्या काजूचे सेवन करावे. दूध हे कॅल्शियमचा उत्तम सोर्स मानले जाते, जे हाडांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसंच काजूमध्ये असणारे विटामिन के, बी६ हाडे आणि सांधेदुखीमधील त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकते. यासाठी रात्र एक ग्लास दुधामध्ये ६-७ काजू भिजवा  दुसऱ्या दिवशी सकाळी या दुधाचे आणि काजूचे सेवन करा.

काजू तुम्ही स्मूदीमध्ये मिक्स करून पिऊ शकता. तुमच्या आवडत्या फळांच्या स्मूदीमध्ये ५-६ काजू ग्राईंड करून त्याचे सेवन केल्याने हाडांना मजबूती मिळते. याशिवाय हाडे दुखत असतील तर त्यापासूनही सुटका मिळते. काजूमधील गुणधर्म हाडांना अधिक बळकटी मिळवून देतात.

काजू खाण्याचे फायदे –

– काजू खाण्याने शरीरातील ऊर्जा वाढायला मदत होते.
– बद्धकोष्ठतेचा त्रास काजू खाल्ल्याने दूर होतो.
– रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित काजू भिजवून खावेत. यामुळे इतरही आरोग्यदायी फायदे होतात.
– कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही प्रमाणात काजू खाण्याचा फायदा होतो.
– वजनावाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात काजूचा समावेश करावा.
– काजू खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते आणि वजनवाढीवरही नियंत्रण राहते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.