पोषक आहाराच्या कमतरतेमुळे पौगंडावस्थेतील मुली लोहाच्या कमतरतेला सामो-या जात आहेत. मुलींच्या शरीरातील लोहोची कमतरता वाढवायला हवी, अन्यथा मुलींच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम दिसून येतील, अशी भीती ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रीक एण्ड गायनॉलोजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’ ( फॉक्सी ) या डॉक्टरांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे.
७५ टक्के मुलींमध्ये लोहाची कमतरता
वैद्यकीय भाषेत या आजाराला अडोलसण्ट अनेमिया असं संबोधलं जातं, अशी माहिती ‘फॉक्सी’चे उपाध्यक्ष डॉ. विपीन पंडित यांनी दिली. तरुणींना मासिक पाळी सुरु होण्याच्या वयात योग्य तो पोषक आणि पुरेसा आहार द्यायला हवा, असंही डॉ. पंडीत म्हणाले.सरकारनं शाळकरी मुलींना लोहोच्या गोळ्या पुरवाव्यात. शिवाय पालकांनीही लोहासह मुलींच्या शरीरात आवश्यक व्हीटॅमीन क आणि ड, प्रथिनांची मात्रा पुरेशी जाते आहे का, याकडेही लक्ष द्यावं. पौगंडावस्थेतील जवळपास ७५ टक्के मुलींना लोहोची कमतरता दिसून येते.
गर्भावस्थेत लोहाची कमतरता जाणवल्यास
शरीरात लोहाची कमतरता जाणवल्यास या आजाराला अनेमिया म्हटलं जातं. अनेमिया हे गर्भावस्थेतील मृत्यूंपैकी प्रमुख कारण ठरतंय. गर्भवती स्त्रीला अनेमिया असल्यास बाळावरही परिणाम होतो. गर्भवती महिलांमधील अनेमिया वेळीच नियंत्रणात आला नाही, तर गर्भातील मूलावरही परिणाम होत असल्याची माहिती ‘फॉक्सी’च्या प्रमुख सदस्या डॉ. कोमल चव्हाण यांनी दिली.
मुलांवर दिसून येणारे परिणाम
- जन्मतःच मृत्यू
- संसर्गाची भीती
- जन्मतःच वजन फारच कमी दिसून येतं
- शारीरिक आणि मानसिक विकासाची गती मंदावते
(हेही वाचा: अखेर ‘लालपरी’चे विलिनीकरण लटकले, मात्र कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ )
Join Our WhatsApp Community