जगभरातून भारतीय लाल मिरचीला मागणी वाढत आहे. त्यामुळे लाल मिरचीच्या निर्यातीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा किटकांचा हल्ला आणि अवेळी पावसामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने दर वाढले आहेत.
देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, अवेळी पाऊस आणि रखडलेली लागवड ही मिरचीच्या कमी उत्पादनाची प्रमुख कारणे आहेत. मिरची उत्पादनापैकी 70 टक्के मिरची देशांतर्गत वापरली जाते, तर 30 टक्के निर्यात केली जाते. भारतातून निर्यात होणाऱ्या सर्व मसाल्यांमध्ये सुक्या मिरचीची निर्यात सर्वात जास्त असल्याचे दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती यांनी सांगितले.
( हेही वाचा : लिंबाचा दरवाढीचा चौकार! )
या देशांमध्ये होते निर्यात
चीन, थायलंड, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेदरलॅंड, जपान, स्वीडन, कॅनडा, इराण, ऑस्ट्रेलिया, इटली
Join Our WhatsApp Community