उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक लोक फिरायला जातात. मुंबईपासून जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक माथेरानला आवर्जून भेट देतात. यामुळे पर्यटक संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये धावणाऱ्या मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणाऱ्या मिनी ट्रेनच्या अमन लॉज ते माथेरान अशा १६ ( ८ डाऊन आणि ८ अप) शटल फेऱ्या सुरू केल्या होत्या. आता या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार आठवड्याच्या फेऱ्या १६ वरुन २० ( १० डाऊन आणि १० अप) होणार आहेत.
( हेही वाचा : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची ‘ओला’, ‘उबर’ टॅक्सी कंपन्यांना नोटीस)
पर्यटकांची पसंती
पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. मध्य रेल्वेने माथेरान हे ठिकाण केवळ प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ असणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने अमन लॉज आणि माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनीट्रेन म्हणजेच ‘माथेरानच्या राणीला’ पर्यटकांची चांगलीच पसंती मिळाल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community