नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘व्हर्जिन हायपरलूप’ म्हणून ओळखली जाणारी ‘हायपरलूप वन’ ही एक अमेरिकन वाहतूक तंत्रज्ञान कंपनी होती. ही कंपनी व्हॅक्यूम ट्रेनचा एक प्रकार असलेल्या हायपरलूप संकल्पनेचा वापर करून हाय-स्पीड प्रवासाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी काम करत होती. ही कंपनी १ जून २०१४ साली स्थापन केली गेली. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०१७ साली त्या कंपनीची पुनर्रचना केली गेली आणि नाव बदलण्यात आलं. (india hyperloop project)
हायपरलूप सिस्टीमचा उद्देश हा विमानाच्या वेगाने माल आणि प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे हा होता. त्यांना चुंबकीय प्रणालींद्वारे अर्धवट रिकामे केलेल्या नळीमध्ये सोडण्यासाठी डिझाइन केलं होतं. मूळ हायपरलूप संकल्पनेत कमी दाबाच्या नळीतून हवेच्या प्रवाहाच्या पॉडची गती वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी रेषीय इलेक्ट्रिक मोटर वापरण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. (india hyperloop project)
(हेही वाचा – वादग्रस्त samay raina ला कोण नाही ओळखत; तो किती पैसे कमावतो?)
हे वाहन ७६० मैल प्रतितास म्हणजेच ताशी १,२२० किलोमीटर वेगाने शांतपणे ट्युबमधून सरकणार होतं. ही प्रणाली पूर्णपणे स्वायत्त, शांत, थेट गंतव्यस्थानावर पोहोचवणारी आणि मागणीनुसार असण्याचा प्रस्ताव होता. ही प्रणाली उंचावर असलेल्या संरचनांवर किंवा बोगद्यांमध्ये बांधली गेली असती. ज्यामध्ये ऍट-ग्रेड क्रॉसिंग नसेल आणि हाय-स्पीड रेल्वे किंवा महामार्गांपेक्षा कमी मार्गाची आवश्यकता असेल. (india hyperloop project)
व्हर्जिन हायपरलूपने एलन मस्क यांच्या सुरुवातीच्या प्रस्तावामध्ये काही महत्त्वाचे तांत्रिक बदल केले. मग मस्कने २०१३ च्या अल्फा-डिझाइन श्वेतपत्रामध्ये कल्पना केलेल्या लॉस एंजेलिस-सॅन फ्रान्सिस्कोच्या काल्पनिक मार्गाचा फॉलोअप न करण्याचा निर्णय घेतला. ११ मे २०१६ साली नॉर्थ लास वेगास इथल्या चाचणी स्थळावर त्यांनी प्रणोदन तंत्रज्ञानाचा एक प्रकार प्रदर्शित केला होता. त्यात त्यांनी ५०० मीटर म्हणजेच १,६०० फूट एवढा डेव्हलपमेंट लूप (डेव्हलूप) पूर्ण केला. त्यानंतर वर्षभराने १२ मे २०१७ रोजी त्यांची पहिली पूर्ण-प्रमाणात चाचणी घेतली. या चाचणीमध्ये व्हॅक्यूम, प्रणोदन, लेव्हिटेशन, स्लेज, नियंत्रण प्रणाली, ट्यूब आणि संरचनांसह हायपरलूप घटक एकत्रित केले गेले. (india hyperloop project)
(हेही वाचा – Vidyavihar Fire Case: विद्याविहारमध्ये हाऊसिंग सोसायटीला आग, एकाचा मृत्यू)
८ नोव्हेंबर २०२० साली ४०० पेक्षा जास्त क्रू नसलेल्या चाचण्यांनंतर कंपनीने लास वेगास, नेवाडा इथल्या त्यांच्या चाचणी स्थळावर १७२ किमी/तास म्हणजेच तशी १०७ मैल एवढ्या वेगाने पहिली मानवी चाचणी केली. तरी फेब्रुवारी २०२२ साली कंपनीने मानवी रेटेड प्रवासाच्या योजना सोडून दिल्या आणि त्याऐवजी मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित केलं. त्यावेळी १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने हायपरलूप वन हे नाव पुन्हा ब्रँड करण्याचा निर्णय घेतला. (india hyperloop project)
२१ डिसेंबर २०२३ साली त्या कंपनीचं कामकाज ३१ डिसेंबर २०२३ साली बंद करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामागे आर्थिक आव्हाने, उच्च व्याजदर, सुरुवातीचा पाठिंबा, तसेच कार्यरत हायपरलूप सिस्टम बांधण्यासाठी कोणतेही करार मिळवण्यात अपयश यांसारख्या अनेक कारणांमुळे कंपनीने आपली मालमत्ता विकण्यास आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली. द व्हर्जच्या मते तिची सर्व बौद्धिक संपदा तिच्या बहुसंख्य भागधारक, प्रमुख दुबई पोर्ट ऑपरेटर डीपी वर्ल्डकडे हस्तांतरित होईल. (india hyperloop project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community