मोबाईलवर वेळ घालवण्यात भारताचा क्रमांक कितवा?

132

मोबाईलनं अनेकांचं जीवनचं बदलून टाकलं आहे. मोबाईल हा आताच्या तरुण पिढीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. चॅटिंग ,कॅालींग आणि इतर महत्त्वाच्या कामांसह मोबाईल मनोरंजनाचे देखील साधन बनत चाललं आहे. घरात असो किंवा बाहेर बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करताना आपल्याला दिसतात. आताच समोर आलेल्या एका अहवालानुसार, कोणत्या देशात मोबाईलचा सर्वाधिक वापर केला जातो हे नमूद करण्यात आले आहे. या यादीत इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आहे. या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे, जाणून घ्या

भारत कितव्या क्रमांकावर 

इंडोनेशियातील लोक दररोज 5.5 तास मोबाईलवर वेळ घालवतात. मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ब्राझील 5.4 तासासह  या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरिया तिस-या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियामध्ये लोक दररोज 5 तास मोबाईल वापरण्यात घालवतात. यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारत मोबाईलवर जास्त वेळ घालवणा-या देशांच्या यादीत जगात 4.8 तासांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेत नवनवीन अॅप डाउनलोड करण्याकडे भारतीयांचा कल अधिक असल्याचही या अहवालात म्हटलं आहे.

(हेही वाचा:  मशिदींवर भोंगे कोणत्या कायद्याखाली? उच्च न्यायालयाचा थेट सवाल )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.