भारताने जगाला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. अमेरिकेला मागे टाकत भारत जगातील दुसरा सर्वाधिक आकर्षक उत्पादन केंद्र बनला आहे. रिअल इस्टेट कंसल्टंट कुशमन आणि वेकफील्ड-२०२१ ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालात भारत दुस-या क्रमांकावर आला आहे.
जगातील दुसरे आकर्षक उत्पादन केंद्र
रिअल इस्टेट कंसल्टंट कुशमन आणि वेकफील्ड २०२१चा ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स अहवाल हा आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे. अहवालानुसार, भारताने वरच्या पायरीवर मजल मारत अमेरिकेला मागे टाकले असून, भारत जगातील दुसरे सर्वात आकर्षक जागतिक उत्पादन केंद्र बनले आहे. युरोप, अमेरिका आणि आशिया पॅसिफिकच्या ४७ देशांमधील जागतिक उत्पादनासाठी सर्वात फायदेशीर ठिकाणांचे मूल्यांकन त्या देशात व्यवसाय करण्याची किंमत, परिस्थिती, जोखीम आणि खर्च या चार प्रमुख मापदंडांनुसार केले आहे.
(हेही वाचाः आळशी पोलिस एफआयआर ऐवजी तक्रारदाराला देतात प्रमाणपत्र)
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
भारताने व्यवसाय करण्यासाठी केलेला खर्च आणि त्यासाठी लागणारी अनुकूल परिस्थिती या निकषांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडे तुलनेने स्वस्त जमीन आणि कामगार आहेत ज्यामुळे खर्च कमी होतो. भारताने कॉर्पोरेट कर 30% वरून 25% पर्यंत करून खर्च कमी केला आहे. “स्किल इंडिया” योजनेद्वारे कुशल कामगारांची संख्या आणि फ्रेट कॉरिडोअर सारख्या प्रकल्पांद्वारे उत्पादनांचा पुरवठा या गोष्टींच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करुन व्यवसाय करण्यासाठी पूर्ण करव्या लागणा-या अटी सुलभ केल्या आहेत.
चीनला मागे टाकण्यासाठी पाऊल
अहवालात पुढे असे म्हटले आहे की, चीनपासून आशियाच्या इतर भागांमध्ये स्थलांतर केल्यामुळे भारताला फायदा होऊ शकतो. या अहवालात असे म्हटले आहे की, जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचे यश सुनिश्चित करण्यासाठी जमीन आणि कामगार कायद्यातील सुधारणा महत्त्वपूर्ण आहेत. चीन सातत्याने आपल्या उत्पादन क्षेत्रात वैविध्य आणत आहे, त्यामुळे त्याला मागे टाकणे आणि प्रथम स्थान मिळवणे हे एक मोठे काम आहे. त्यासाठी जलद सुधारणांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे.
(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांच्या पगाराची ‘वाट’ खडतर… कधी होणार पगार?)
Join Our WhatsApp Community