सध्या स्पर्धेच्या युगात अनेक खासगी कंपन्या कमर्चाऱ्यांना अक्षरशः राबवून घेतात, जेवढा जास्त पगार तेवढे कामाचे तास अधिक, असे जणू समीकरण बनले आहे. त्यामुळे आठ तासांची ड्युटी हे केवळ नावापुरते झाले आहे. प्रत्यक्षात बऱ्याच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या व्यतिरिक्त अतिरिक्त वेळ कार्यालयात काम करावे लागते, त्याचे पैसे अर्थात ओव्हर टाइमदेखील मिळत नाही. अशा परिस्थितीत भोपाळ येथील एक कंपनी आहे, जी बरोबर याच्या विरोध कर्मचाऱ्यांसोबत वर्तन करत आहे.
मध्य प्रदेशातील कंपनीचा अनोखा प्रयत्न
कर्मचाऱ्याने त्याचे आठ तासांचे काम पूर्ण केले की, मध्य प्रदेशच्या इंदौरमधील SoftGrid Computers ही कंपनी पुढच्या एक मिनिटासाठीही कर्मचाऱ्याला कार्यालयात बसवत नाही. लागलीच डेस्कटॉप लॉग करते आणि वॉर्निंगही देते. शिफ्ट संपल्यानंतर कोणतेही कॉल्स किंवा मेल येणार नाही. सावधान! तुमची शिफ्ट संपली आहे. ऑफिस सिस्टम 10 मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा, असा संदेश कम्प्युटरवर दिसतो. या कंपनीच्या एचआर तन्वी खंडेलवाल यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने असे प्रत्येक कामाच्या ठिकाणी हवे, असे म्हटले आहे, तर एका युझरने, असे प्रयत्न काम करायला प्रोत्साहन देतात, असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community