भारतातील ‘ही’ ठिकाणं देतील विदेश प्रवासाचा आनंद!

137

कोरोनामुळे अनेक लोक विमानप्रवास टाळत स्वदेशी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. आज आपण भारतातील अशा काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला विदेश प्रवासाचा आनंद मिळेल

केरळ आणि व्हेनिस, इटली

केरळ हे दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. “केट्टुवल्लम” या नावाने ओळखल्या जाणार्‍या हाऊसबोटीवर पर्यटक आणि स्थानिक मोठ्या संख्येने येतात. केरळमधील शेती, निसर्ग आणि पक्ष्यांच्या विहंगम दृश्यांचा घेताना, व्हेनिसमध्ये असल्यासारखाच आभास होतो. केरळला तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान भेट देऊ शकता.

( हेही वाचा : जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जेजे रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम! )

गुलमर्ग, जम्मू-काश्मीर आणि स्वित्झर्लंड

गुलमर्ग हे सुंदर शहर श्रीनगर शहरापासून ५२ किमी अंतरावर आहे. गुलमर्ग हे काश्मिरमधील प्रमुख पर्यटक आकर्षण आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेपासून सुटका करण्यासाठी अनेक लोक काश्मिरला जातात. बर्फाचा आनंद लुटण्यासाठी डिसेंबर ते मार्च हा सर्वात चांगला काळ आहे. गुलमर्ग, जम्मू-काश्मीरला मिनी स्वित्झर्लंडदेखील म्हटले जाते.

थार वाळवंट, राजस्थान आणि सहारा वाळवंट, आफ्रिका

थार वाळवंट हे ग्रेट इंडियन वाळवंट म्हणूनही ओळखले जाते, हे वाळवंट जगातील १८ व्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि सर्वात दाट लोकवस्ती असलेले वाळवंट आहे. हा भव्य प्रदेश सहारा वाळवंटाइतकाच सुंदर आहे. डिसेंबर ते जानेवारी हा काळ राजस्थान दौरा करण्यासाठी उत्तम काळ आहे.

लक्षद्वीप आणि मालदीव

लक्षद्वीप या संस्कृत शब्दाचा अनुवाद “एक लाख बेटे” असा होतो. हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये 36 बेट आहेत. निळे पाणी, समृद्ध सागरी जीवन, सुंदर लँडस्केप, प्रवाळ खडक, निसर्गरम्य सौंदर्य आणि विलोभनीय वातावरण यामुळेच लक्षद्वीपमध्ये मालदिवसारखा आनंद मिळतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.