Indian Passport : भारतीय नागरिक ‘या’ ६० देशांमध्ये करू शकतात व्हिसामुक्त प्रवास! ‘हे’ आहेत जगातील पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश

हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्व देशांचे पासपोर्ट रॅंकिंग जाहीर केले आहे. यामुळे जगातील पॉवरफुल आणि सर्वात खालच्या क्रमांकावर कोणत्या देशाचा पासपोर्ट हेही स्पष्ट झाले आहे. जपानचा पासपोर्ट जगात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. तर, अफगाणिस्थानचा पासपोर्ट या यादीत सर्वात शेवटत्या स्थानावर आहे. या यादीत भारतीय पासपोर्ट ८७ क्रमांकावर आहे. जपानचा पासपोर्ट जगात सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे तेथील लोक आता १९३ देशांमध्ये व्हिसामुक्त अथवा व्हिसा ऑन Arrival या सुविधेअंतर्गत प्रवास करू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचा पासपोर्ट आहे, येथील नागरिक १९२ देशांमध्ये जाऊ शकतात.

( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा! )

रॅंकिंग कसे ठरवले जाते?

हेनले अँड पार्टनर्स ही लंडनमधील इमिग्रेशन कन्सल्टन्सी दरवर्षी जगभरातील देशांचे पासपोर्ट रॅंकिंग जाहीर करते. ज्या देशाचा पासपोर्ट या रॅंकिंगनुसार अव्वल ठरतो तो पासपोर्ट बाळगणारे नागरिक जगातील जास्तीत जास्त देशांमध्ये जाण्यास आणि तिथे फिरण्यास पात्र ठरतात. ज्या देशातील नागरिकांना इतर देशात फिरताना व्हिसाची आवश्यकता नसते त्या देशाच्या पासपोर्टला पहिला क्रमांक दिला जातो. या यादीत भारत ८७ व्या क्रमांकावर आहे. ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असले ते विना व्हिसा ६० देशांमध्ये प्रवास करू शकतात. या यादीत पाकिस्तान १०९ व्या क्रमांकावर आहे.

भारतीय या ६० देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा ऑन Arrival अंतर्गत प्रवास करू शकतात…

 1. कुक बेटे
 2. फिजी
 3. मार्शल बेटे
 4. मायक्रोनेशिया
 5. नियू
 6. पलाऊ बेटे
 7. सामोआ
 8. तुवालु
 9. वानू
 10. इराण
 11. जॉर्डन
 12. ओमान
 13. कतार
 14. अल्बेनिया
 15. सर्बिया
 16. बार्बाडोस
 17. ब्रिटिश व्हर्जिन बेटे
 18. डोमिनिका
 19. ग्रेनेडा
 20. हैती
 21. जमैका
 22. मोन्सेरात
 23. सेंट किट्स आणि नेव्हिस
 24. सेंट लुसिया
 25. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
 26. त्रिनिदाद आणि टोबॅगो
 27. भूतान
 28. कंबोडिया
 29. इंडोनेशिया
 30. लाओस
 31. मकाओ (SAR चीन)
 32. मालदीव
 33. म्यानमार
 34. नेपाळ
 35. श्रीलंका
 36. थायलंड
 37. तिमोर-लेस्टे
 38. बोलिव्हिया
 39. एल साल्वाडोर
 40. बोत्सवाना
 41. बुरुंडी
 42. केप वर्दे बेटे
 43. कोमोरो बेटे
 44. इथिओपिया
 45. गॅबॉन
 46. गिनी-बिसाऊ
 47. मादागास्कर
 48. मॉरिटानिया
 49. मॉरिशस
 50. मोझांबिक
 51. रवांडा
 52. सेनेगल
 53. सेशेल्स
 54. सिएरा लिओन
 55. सोमालिया
 56. टांझानिया
 57. टोगो
 58. ट्युनिशिया
 59. युगांडा
 60. झिंबाब्वे

टॅाप 10 पासपोर्ट

देश – व्हिसामुक्त प्रवास किती देशात करता येणार ?

 • जपान – १९३
 • सिंगापूर, साऊश कोरिया – १९२
 • जर्मनी, स्पेन – १९०
 • फिनलॅंड, इटली, लक्झेंबर्ग – १८९
 • ऑस्ट्रिया, डेनमार्क, नेदरलॅंड, स्वीडन – १८८
 • फ्रांस, आयर्लंड, पोर्तुगाल, युके – १८७
 • बेल्जियम, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, युनायटेड स्टेट्स – १८६
 • ऑस्ट्रेलिया, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा – १८५
 • हंगेरी – १८३
 • लिथुआनिया, पोलंड, स्लोव्हाकिया – १८२

फ्लॉप 10 पासपोर्ट

देश – व्हिसामुक्त प्रवास किती देशात करता येणार ?

 • डेम. काँगो, लेबनॉन, श्रीलंका, सुदानचे – ४२
 • बांगलादेश, कोसोवो, लिबिया – ४१
 • उत्तर कोरिया – ४०
 • नेपाळ, पॅलेस्टाईन प्रदेश – ३८
 • सोमालिया – ३५
 • येमेन – ३४
 • पाकिस्तान – ३२
 • सीरिया – ३०
 • इराग – २९
 • अफगाणिस्थान – २७

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here