कोरोना काळात लाॅकडाऊनच्या दरम्यान, सगळे शेफ झाले होते. प्रत्येकजण काही ना काही नवीन पदार्थ बनवून पोस्ट करत होते. कोणी कुकरमध्ये केक कसा बनवायचा शिकलं, तर काही जण डाल्गोना काॅफी बनवण्यात व्यस्त होते. पण या सगळ्यात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, एका कुटुंबाने आपले स्वप्न साकार करत, युट्यूब वर पाहून घरात विमान बनवले आहे. होय, हे खरं आहे. ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या कुटुंबाने आपल्या स्वप्नांना पंख देत, घराच्या अंगणात चक्क विमान बनवलं आहे.
वेळेचा केला सदुपयोग
दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळात या भारतीय वंशाच्या कुटुंबाने आव्हानात्मक कामगिरी करत, चार आसनी विमान तयार केले आहे. भारतीय वंशाचा इंजिनीअर आणि एसेक्स काउंटीच्या बिलेरिकेतील पायलट म्हणून ज्यांच्याकडे परवाना आहे, असे 38 वर्षीय अशोक अलिसेरिल यांनी आपली पत्नी अभिलाषा दुबे (35), आणि त्यांच्या मुली तारा (6) आणि दिया (3) यांनी मिळून अखेर आपल्या घरामागील बागेत एक लहान विमान तयार करुन, आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
असे केले स्वप्न साकार
या कुटुंबाला नेहमीच असं वाटत होतं की, आपलं एक विमान असावं. हीच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी या कुटुंबाने लाॅकडाऊनचा योग्य वापर करत, आपल्या घरातील अंगणात विमान तयार करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी पैशांची बचत केली. या बचत केलेल्या पैशांतून त्यांनी विमानासाठी लागणा-या साहित्याची खरेदी केली आणि दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर, त्यांच्या स्वप्नातील विमान पूर्ण झाले. हे विमान बनवण्यासाठी या कुटुंबाला 1 कोटी 40 लाख इतका खर्च आला.
( हेही वाचा :ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय! सरळसेवेतील पदं एमपीएससी मार्फत भरणार )
मुलींची उत्सुकता शिगेला
द सन ला दिलेल्या मुलाखतीनुसार, अशोक यांच्या पत्नी अभिलाषा दुबे यांनी सांगितले की, आमच्या मुली हवेत उडण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्या दोघी आतापर्यंत काही वेळाच विमानात बसल्या आहेत. पण, यावेळी त्या पहिल्यांदाच आपल्या वडिलांना पायलट म्हणून पाहणार आहेत.
Join Our WhatsApp Community