सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करणा-या देशांची यंदाच्या वर्षीची यादी टेस्ट अॅटलास या वेबसाइटने तयार केली असून, त्यात भारताने पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यादीत इटली, ग्रीस, स्पेनला अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळाला आहे. भारतीय खाद्यपदार्थांसाठी 4.5 गुण मिळाले आहेत. गरम मसाला, मलई, तूप, बटर, गार्लिक नान, खिमा आदी गोष्टींचा समावेश असलेला भारतीय खाद्यपदार्थ जगभरातील लोकांना पसंत असल्याचे या यादीत म्हटले आहे.
या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये जपान, अमेरिका, फ्रान्स, तुर्कस्थान, पेरू, मेक्सिको या देशांचाही समावेश आहे. चिनी खाद्यपदार्थ जगात अत्यंत लोकप्रिय आहेत असे म्हटले जाते. पण टेस्ट अॅटलासच्या यादीत चीनला 11 वे स्थान मिळाले आहे.
मुंबईचे सेस्टाॅरंट उत्कृष्ट
भारतीय खाद्यपदार्थांसाठी मुंबईच्या काळबादेवी परिसरातील श्री ठाकरे भोजनालय, बंगळुरु येथील करावल्ली, दिल्लीतील बुखारा, दम पुख्त, गुरुग्राम येथील कोमोरिनसह सुमारे 450 रेस्टाॅरंट उत्कृष्ट असल्याचे टेस्ट अॅटलासच्या यंदाच्या वर्षीच्या यादीत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community