- ऋजुता लुकतुके
भारतीय नौदलात विविध पदांसाठी लागू होणारा पगार हा नौदलाच्या https://www.joinindiannavy.gov.in/en/page/pay-scale-of-officers.html या अधिकृत वेबसाईटवर दिलेला असतो आणि ही वेबसाईट वारंवार अपडेटही होते. त्यामुळे प्रत्येक पदाला मिळणारा पगार आणि त्यात होणारी वाढ आपल्याला समजू शकते.
नौदलासाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना नौदलात समाविष्ट करून घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जाऊन त्यांच्यावर पात्रतेनुसार नौदलातील जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. तुमचं पद, पदावरील जबाबदाऱ्या, पदोन्नती आणि पदाला लागू होणारे विविध भत्ते यावरून तुम्हाला मिळणारा पगार ठरतो. पण, नौदलाची वेबसाईट बघितली की, लक्षात येईल की, सगळ्यात खालच्या रँकच्या कर्मचाऱ्याला भत्त्यांसहीत वार्षिक ४ लाख रुपये इतका मोबदला मिळतो. तोच वरिष्ठ अधिकाऱ्याला वार्षिक ३६.५ लाख रुपयेही मिळतात. याशिवाय नौदलात तुम्हाला विमा सुरक्षा मिळते. आणि या विम्यावरील हफ्ता हा सवलतीच्या दरात असतो.
(हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता; DCM Eknath Shinde यांची घोषणा)
नौदलात नुकत्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार पाहूया,
अग्निवीर योजनेअंतर्गतही नौदलात प्रवेश करता येतो. नौदलाकडून कमी कालावधीसाठी या योजनेअंतर्गत सैन्य भरती केली जाते आणि ३ वर्षांत तुमचं कसब सिद्ध केल्यास त्या तरुणांना पूर्णवेळ सेवेत घेतलं जातं. अग्निवीरांना पूर्वनिर्धारित मासिक ३०,००० इतका पगार मिळतो आणि इतर सैन्यातील फायदेही मिळतात. शिवाय १० लाख रुपयांचं सेवानिधी पॅकेजही त्यांना मिळतं.
नौदल अधिकाऱ्यांना त्यांचं पद आणि अनुभवानुसार पगार वाढत जातो. सध्या सब-लेफ्टनंट पदावरील व्यक्तीला ५६,००० ते १,७७,५०० या स्केलमध्ये पगार आहे. तर सर्वोच्च पद असलेल्या नौदल प्रमुखांना मासिक २,५०,००० रुपये इतका पगार व इतर भत्ते तसंच सुविधा मिळतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community