भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी करतात. नागरिकांचा प्रवास सोयीस्कर व्हावा तसेच प्रवासादरम्यान नागरिकांना कन्फर्म सीट मिळावी यासाठी IRCTCने अनेक नियम बनवले आहेत. व्यवस्थित सुविधा मिळाल्या नाही तर बरेच प्रवासी तक्रारीही करतात. ज्येष्ठ नागरिकांची महत्त्वाची तक्रार लोअर बर्थसाठी असते. अलिकडेच ७४ वर्षांच्या आजीला अप्पर बर्थ दिल्याचा प्रकार घडला होता.
( हेही वाचा : मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत)
आपण तिकीट बुक करताना सर्वसाधारण कोट्यात बुक करतो तेव्हा तुम्हाला आवडीनुसार सीट मिळू शकत नाही असे स्पष्टीकरण आयआरसीटीने यावर दिले होते. बुक करताना आपण प्राधान्याने कोटा सिलेक्ट केला तरच आपल्याला या सीटचा लाभ घेता येऊ शकतो. तिकीट बुक करताना लोअर बर्थ अलॉट असेल तरच बुक करा असा पर्याय सिलेक्ट करणे गरजेचे आहे. तसेच ऑनड्युटी टीटीईंशी संपर्क साधून सुद्धा तुम्ही गरजू व्यक्तींना खालचा बर्थ देण्यासाठी विनंती करू शकता.
सर, पीएनआर नं. 2448407929 सामान्य कोटे में बुक है। सामान्य कोटे में आप लोअर बर्थ के लिए वरीयता दे सकते हैं लेकिन बर्थ का आवंटन उपलब्धता पर निर्भर करता है। उसके बाद आपको रिजर्वेशन च्वाइस "Book only if lower berth is allotted" का चयन करना होगा। 1/2 https://t.co/mHVOy9jsHD
— IRCTC (@IRCTCofficial) September 22, 2022
रेल्वेच्या प्रत्येक डब्यांमध्ये स्लीपर क्लाससह एसी-३टायर, एसी-२ टायरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा कोटा निश्चित केला जातो. ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना तसेच महिला आणि गर्भवती महिला प्रवाशांनाही भारतीय रेल्वे ही सुविधा उपलब्ध करून देते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कसे बुक कराल तिकीट ?
- IRCTC च्या अधिकृत पेजवर लॉगिन करा.
- लॉगिन करून, तुम्हाला हव्या असलेल्या गाडीचे तिकीट बुक करताना, बर्थ preference असा पर्याय दिसेल या ठिकाणी lower birth हा पर्याय निवडा तसेच कोटा ज्येष्ठ नागरिक सिलेक्ट करायला विसरू नका.
- IRCTC मधून तिकीट बुक करताना तुम्हाला अजून एक पर्याय दिसेल तो म्हणजे, lower birth Only हा पर्याय सिलेक्ट करून तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विशिष्ट बर्थची मागणी करू शकता.